एक्स्प्लोर

Bhiwandi : पडघ्यातील कुख्यात गुंडावर हद्दपारीची कारवाई; भिवंडी प्रांत अधिकाऱ्यांचे आदेश 

Bhiwandi Crime : कुख्यात गुंड वाहिद नजीर चिखलेकर याच्यावर 6 दखलपात्र आणि 1 अदखलपात्र गुन्हा नोंद आहे. 

ठाणे : भिवंडी तालुक्यातील पडघा येथील कुख्यात गुंड वाहिद नजीर चिखलेकर (रा. राहुर,भिवंडी) याच्यावर भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांनी हद्दपारीची कारवाई केली आहे. प्रांत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहिद चिखलेकर याने भिवंडीसह पडघा परिसरात दहशत पसरवली असून त्यांच्यावर 2004 ते 2023 पर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 6 दखलपात्र आणि 1 अदखलपात्र गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये 6 गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत. यासह वाहिदच्या विरोधात पडघा पोलिस ठाण्यात सीआरपीसी कलम 107 अन्वये 2 आणि 110 अन्वये  असे 3 गुन्हे दाखल आहेत. 

या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेऊन पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या 8 जानेवारी 2024 च्या शिफारसीनुसार उपविभागीय अधिकारी सानप यांनी निवडणुकीच्या व्यस्ततेतून मुक्त झाल्यानंतर 21 जानेवारी 2025 रोजी वाहिदवर ठाणे, रायगड, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नाशिक जिल्ह्यातून रोजी 2 वर्षांकरिता हद्दपारची कारवाई केली आहे.

दरम्यान याबाबतची प्रत पोलिस अधिक्षक ठाणे (ग्रामीण),उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशपुरी विभाग आणि पडघा पोलिस ठाण्याचे वपोनि यांनाही पाठवण्यात आली आहे. त्यातच हद्दपार इसम वाहिदने ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नाशिक जिल्ह्याच्या बाहेर गेल्यापासून अथवा त्याला हद्दपार केल्यापासून पुढील एक वर्षाच्या कालावधीपर्यंत उपविभागीय दंडाधिकारी भिवंडी विभाग अथवा शासनाच्या लेखी परवानगीशिवाय ठाणे, पालघर, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर व नाशिक जिल्ह्यात प्रवेश करु नये असा आदेश आहे.

हा आदेश अंमलात असेपर्यंत वाहिदने हद्दपार केलेल्या जिल्ह्या व्यतिरीक्त महाराष्ट्र राज्यात जेथे कोठे रहिवास करत असेल, त्या रहिवासाजवळच्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये महिन्यातून एकदा हजेरी देणे बंधनकारक असणार आहे. तसेच वाहिद महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जाणार असल्यास राज्याबाहेर गेल्यापासून 10 दिवसाच्या आत त्याने त्याच्या जाणेबाबत नजिकच्या प्रभारी पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असेल. 

राज्याबाहेरून परत आल्यावरही याबाबत त्याने नजिकच्या प्रभारी पोलीस स्टेशनला कळविणे बंधनकारक असेल. त्याचप्रमाणे पडघा पोलीस निरीक्षकांनी सदर आदेशाची कोटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची दक्षता घ्यावी असे शेवटी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रांत अधिकाऱ्यांनी वाहिदवर तडीपारीचे आदेश देताच तो फरार झाला असून पडघा पोलिस त्याचा शिताफीने शोध घेत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत,  एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीसDattatray Bharne Pune | क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हॉलीबॉल खेळताना जमिनीवर कोसळले ABP MajhaPune : पुण्यात क्रौर्याची परिसीमा गाठली, शिलाई मशीनच्या कात्रीनं पतीने पत्नीची हत्या केल्याची घटनाNanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
टायरची काळजी कशी घ्याल? ते सुस्थितीत राहण्यासाठी काय कराल? 
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Devendra Fadnavis : महाराष्ट्रासाठी मोठी गुंतवणूक, तरुणांना रोजगाराच्या संधी, देवेंद्र फडणवीस दोवोसमधून काय काय म्हणाले?
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
दावोसमध्ये फडकला बीड जिल्ह्याचा झेंडा; परळीपुत्राच्या उपस्थितीत 500 कोटींचा करार, 1200 रोजगार
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Embed widget