एक्स्प्लोर

सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा, भिवंडी हत्या प्रकरणाचा छडा, चार आरोपींना अटक

12 मे रोजी भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथे कामावर निघालेल्या 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या झाली होती. सुपारी देऊन भावानेच काढला सख्ख्या भावाचा काटा काढल्याचे समोर आले आहे.

Bhiwandi Crime News : भिवंडी तालुक्यातील शेडगाव येथे कामावर निघालेल्या 40 वर्षीय व्यक्तीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 12 मे रोजी उघडकीस आली होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरुन गेला होता. गणेशपुरी पोलिसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकांनी अथक प्रयत्नातून या हत्येच्या गुन्ह्यातील चार आरोपींना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. यामध्ये हत्येची सुपारी देणाऱ्या सख्ख्या भावाचा सुद्धा समावेश आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 मे रोजी तालुक्यातील शेडगाव या गावातील परेश टोलाराम पाटील वय 40 वर्ष हा पाऊणे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकी वरुन वसई येथे कामावर जात असताना वाशिंद-अंबाडी रोड शेडगाव फाटा या दरम्यान गावतलावा जवळ कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्याराने डोक्यावर वार करून गंभीर जखमी करून हत्या केली होती. याबाबत त्याचा भाऊ नरेश पाटील वय 37 याने गणेशपुरी पोलिस ठाण्यात हत्येच्या गुन्ह्याची फिर्याद दिली होती. या हत्येने परिसर हादरून गेला असताना गणेशपुरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कमलेश बच्छाव व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वा खाली सात पोलीस उपनिरीक्षक यांची पथके तयार करून तपास सुरू केला. या पोलिस पथकाने अथक परीश्रम घेऊन 200 सीसीटीव्ही कॅमेरे पाहणी केली तसेच, तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्यात आरोपींनी गुन्हा करण्या करीता वापरलेल्या वाहनाचा क्रमांक प्राप्त करून गुन्ह्यातील आरोपी राकेश भगवान पाटील, प्रेमजीत मधुकर घरत, दक्षत भानुकांत भोईर सर्व रा.आगरवाडी केळवा जि.पालघर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कडे गुन्ह्याच्या तपासात त्यांनी हत्येची कबुली दिली. 

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाच्या हत्येची सुपारी दिली होती

गुन्ह्यात फिर्यादी असलेला मृत परेश याचा सख्खा भाऊ नरेश टोलाराम पाटील याने मारण्याची सुपारी देऊन भावास जीवे ठार मारण्याचा कट रचला असल्याचे कबुल केल्याने या गुन्ह्यात चार ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाने भावाच्या हत्येची सुपारी दिली होती. मयत परेश व आरोपी नरेश हे सख्खेभाऊ असून त्यांची सामायिक शेत जमीन मोठा भाऊ परेश याने आपल्या नावे करून घेतली होती, तसेच घर सुद्धा आपल्या नावे केले होते. या गोष्टीचा राग मनात धरून छोटा भाऊ नरेश याने दहा लाख रुपयांची आपल्या भावाच्या हत्येची सुपारी केळवा पालघर येथील गुंडांना दिली होती.

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
SIR News : मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
मतदानाचे फॉर्म घेऊन घरी का आला नाहीस म्हणत BLOला मारहाण; परळीत 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर वर्ध्यात SIRच्या कामात कुचराई भोवली; तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Navi Mumbai Crime: एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
एकनाथ शिंदेंच्या शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुखाला अटक, भंगारवाल्याकडून दोन लाखांची खंडणी मागितली, नकार मिळताच मारहाण
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
Embed widget