एक्स्प्लोर

Bhiwandi : खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी आईकडे लाच मागितली, भिवंडीत सहाय्यक पोलीस निरीक्षक अँटी करप्शनच्या जाळ्यात 

Bhiwandi Crime : खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी लाचखोर सहाय्य्क पोलीस निरीक्षकाने आरोपी मुलाच्या आईकडून पैशाची मागणी केली होती. 

ठाणे : भिवंडी येथील नारपोली पोलिस ठाण्यातील (Bhiwandi Narpoli Police Station) सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांना दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना नारपोली पोलिस ठाण्यातच ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. खुनाच्या गुन्ह्यातून मुलाचं नाव कमी करण्यासाठी त्याने आरोपीच्या आईकडून लाच मागितली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 25 नोव्हेंबर रोजी अपहरण झालेल्या 16 वर्षांचा योगेश रवी शर्मा या अल्पवयीन मुलाची हत्या करून मृतदेह गाडून, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे 7 डिसेंबर रोजी उघड झाले होते. या प्रकरणी नारपोली पोलिसांनी दाखल केलेल्या हत्येच्या गुन्ह्यात आयुश विरेंद्र झा, मनोज नारायण टोपे, अनिकेत तुकाराम खरात, शिवाजी धनराज माने, संतोष सत्यनारायण ताटिपामुल या आरोपींना अटक करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार हे करीत होते.

गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी लाच मागितली

आरोपी अनिकेत खरात याचे नाव गुन्ह्यातून कमी करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, नाहीतर कुटुंबीयांना या प्रकरणात अडकवण्याची धमकी सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांनी दिली. त्यानंतर त्याने अनिकेतच्या आईकडे 5 लाखांची मागणी केली. त्यानंतर तडजोड होऊन अनिकेतच्या आईने दोन लाख देण्याचे कबूल केले.

दरम्यान, अनिकेतच्या आईने सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद पवार यांची तक्रार ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नारपोली पोलिस ठाण्यात मंगळवारी सकाळी केलेल्या कारवाईत शरद पवार यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडेच मागितली लाच

शिर्डीत चक्क महसूलमंत्र्यांच्या संस्थेकडून लाच घेताना वजनमापे निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलंय. अशोक श्रीपती गायकवाड असे या अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. हा अधिकारी महसूलमंत्री विखे पाटील यांच्या सहकारी संस्थेच्या पेट्रोलपंपाची वार्षिक  तपासणी करून स्टॅपिंग प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात लाच घेण्याची मागणी केली. हीच लाच घेताना या आरोपीला लाचलुचपत विभागानं अटक केली आहे. यासंदर्भात पेट्रोलपंप व्यवस्थापकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तडजोडीअंती त्याने 10 हजार रुपये घेण्याचे मान्य केले.  या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 19 November 2024Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget