एक्स्प्लोर

Bhandup Accident :भांडुपमध्ये निर्माणाधीन इमारतीच्या स्लॅबचा ढाचा कोसळला, लग्नाला आलेले वऱ्हाडी थेट खड्ड्यात पडले, एकाचा दुर्दैवी अंत, 10 जण जखमी

Bhandup : भांडुप परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. यात पहिल्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅबचा ढाचा कोसळल्याने 11 तरुण खाली पडल्याची घटना घडली.

Mumbai Bhandup Accident : मुंबईतील भांडुप परिसरात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत मोठी दुर्घटना (Accident) घडली आहे. यात पहिल्या मजल्यावर स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना अचानक स्लॅबचा ढाचा कोसळल्याने (Bhandup building slab collapse) 11 तरुण खाली पडल्याची घटना घडली. या दुर्घटनेत एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्लॅबसाठी लोखंडी सळ्या आणि लाकडी आधाररचना उभी करण्यात आली होती. मात्र अचानक वजन वाढल्याने हा संपूर्ण ढाचा कोसळलाय. यात खाली सुमारे 25 ते 30 फूट खोल जागा असल्यामुळे हे सर्व तरुण थेट खाली कोसळले आणि दुर्घटना अधिक गंभीर ठरली. (Bhandup building slab collapse accident) 
 
Bhandup Accident : लग्नाला आलेले वऱ्हाडी खड्ड्यात पडले; एकाचा मृत्यू, १० जखमी

दरम्यान, हे सर्व 11 तरुण जवळच सुरू असलेल्या एका लग्नाच्या मंडपातून या ठिकाणी आले होते, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, ते नेमके कशासाठी या बांधकामस्थळी गेले होते, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित असून पोलिसांकडून याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून सध्या पाहणी आणि बचावकार्य सुरू आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून बांधकामातील सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Crime News : टिटवाळा ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट, पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

टिटवाळा ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यातील अश्विनी पॉलचा लिव्ह इन पार्टनर आमिर सय्यदने तब्बल 25000 एक्स्टसी गोळ्यांची तस्करी केल्याच तपासात समोर आलं आहे. या सगळ्या एक्स्टस गोळ्या त्याने परदेशातून तस्करी केल्याचा अमली पदार्थ विरोधी कक्षाला संशय असून त्या दिशेने आता तपास केला जात आहे. यातील 5030 एक्स्टसी गोळ्यांसह अश्विनी पॉलला अटक करण्यापूर्वी त्याने 20,000 गोळ्या विकल्याच समोर आलं आहे. तर उर्वरित ड्रग्स विकण्यापूर्वीच आमिर सय्यदाला अटक झाली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आमिर सय्यदचा अमली पदार्थ विरोधी पथकाने ताबा घेतला असून ड्रग्स नेमकं कुठून आणलं आणि ते कोणा कोणाला विकलं? याचा अमली पदार्थ विरोधी कक्षाकडून तपास सुरू आहे

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
एकमेकाकडं पाहण्याच्या कारणावरुन वाद, परांड्यात भर चौकात तुंबळ हाणामारी, अनेकजण जखमी
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
सैन्यदलातील जवानाने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला संपवलं, वाशिम जिल्ह्यात खळबळ, दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा नातेवाईकांचा आरोप
Pune Crime News: वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
वर्गमैत्रिणीसोबत प्रेमसंबंधाचा संशय, तरुणाला भररस्त्यात पाठलाग करून संपवलं, पुण्यातील धक्कादायक घटना
Baramati Crime News: 'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा
'दृश्यम' स्टाईलने नवऱ्याला घरातच जिवंत पुरण्याचा प्रयत्न, गुंगीचं औषध देऊन बॅटने मारहाण, बारामतीमधील महिलेचा हादरवणारा कारनामा

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Embed widget