Bhandara News : डॉक्टरला मारहाण करणाऱ्या जि. प. सदस्याला अटक; सदस्यत्व रद्द न केल्यास मॅग्मो संघटनेचा आंदोलनाचा इशारा
भंडाऱ्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन पाचघरे यांना मारहाण केल्या प्रकरणी मॅग्नो संघटना चांगलीच आक्रमक झालीय. डॉ. नरेश ईश्वरकर यांना मारहाण करणाऱ्याचे जि.प सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केलीय.
Bhandara News भंडारा : भंडाऱ्याच्या (Bhandara News) बेटाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पवन पाचघरे यांना जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांनी मारहाण केली होती. या प्रकरणी मोहाडी पोलिसांनी गुन्हा नोंद करून नरेश ईश्वरकर यांना अटक केली होती आणि त्यानंतर त्यांना सूचना पत्रावर सोडलं देखील होते. त्यामुळे आता या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भंडाऱ्यातील मॅग्नो संघटना आक्रमक झाली आहे. जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना संरक्षण द्यावं आणि डॉक्टरला मारहाण करणाऱ्या नरेश ईश्वरकर यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
डॉक्टरला मारहाण करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याला अटक
आपल्या मागणीला घेऊन मॅग्मो संघटना भंडाऱ्यात चांगलीच आक्रमक झाली आहे. जिल्हा परिषद सदस्य नरेश ईश्वरकर यांचं जिल्हा परिषद सदस्यत्व रद्द करावं अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. परिणामी, आपल्या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेलं आहे. ईश्वरकर यांच्यावर तातडीनं कारवाई नं झाल्यास सर्व वैद्यकीय अधिकारी मोठं आंदोलन करेल, याचा फटका नागरी आरोग्य सेवेवर पडल्यास त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा मॅग्नो संघटनेनं दिला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता प्रशासन नेमकं काय कारवाई करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भंडाऱ्यात आणखी 12 कृषी केंद्रांवर विक्री बंदीची कारवाई
शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खतांची विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांनी कृषी विभागानं काही नियम आणि अटी आखून दिल्या आहेत. असे असताना आखून दिलेले नियम पायदळी तुडविल्या प्रकरणी भंडाऱ्यात आणखी 12 कृषी केंद्रांवर विक्री बंदीची कारवाई करण्यात आली आहे. मागील आठवड्यात सात कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली होती. त्यात आता 12 कृषी केंद्रांची भर पडली असून आतापर्यंत या खरीप हंगामाच्या मोसमात भंडारा जिल्ह्यातील 19 कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. बी बियाणे आणि खतं विक्री करताना दुकानात दर्शनी भागात दर फलक न लावणे, स्टॉक रजिस्टर अद्यावत न ठेवणे, बियाणे कंपनीचे मूळ प्रमाणपत्र सादर न करणे, बिल बुक आणि पीओएस वर विक्री केलेल्या निविष्ठांची संपूर्ण माहिती न देणं आदी नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या भरारी पथकाच्या या कारवाईनं भंडारा जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या