
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhandara News: धक्कादायक! वडिलांनी मोबाईल वापरण्यावरून हटकलं, अल्पवयीन मुलानं उचललं टोकाचे पाऊल
Bhandara News: मोबाईल वापरण्यावरून वडिलांनी हटकल्याने एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.

Bhandara News: परीक्षेचे दिवस असल्यानं वडिलांनी नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला मोबाईल (Mobile) बाजूला ठेवून अभ्यास कर, असं म्हंटलं. वडिलांनी मोबाईल खेळण्याला विरोध केल्याचा राग मनात ठेवून मुलानं टोकाचं पाऊल उचलत शाळेच्या टायने गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. ही हृदयद्रावक घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील चन्ना (धानला) गावात घडली. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हिमांशु गुणेश राघोर्ते असं टायने गळफास घेवून आत्महत्या करणाऱ्या नववीच्या विद्यार्थ्याचं नाव असून तो 15 वर्षांचा होता. हिमांशु हा लाखनी येथील समर्थ विद्यालयात इयत्ता नवव्या वर्गात शिक्षण घेत असून सध्या परीक्षेचे दिवस तोंडावर आहे. वडील गुणेश यांनी मुलगा अभ्यास न करता मोबाईलवर खेळत असल्याचं दिसून आलं. त्यांनी मुलाला मोबाईल ठेवून अभ्यास करण्याबाबत हटकले. वडिलांनी हटकल्यानं मुलगा हिमांशु याने हा राग मनावर घेतला आणि टोकाचं पाऊल उचलत घरातील छताच्या लोखंडी कडीला शाळेच्या स्वतःच्या टायने गळफास घेतला.
कुटुंबियांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी हिमंशुला तातडीनं खाली उतरवून लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हिमांशुची तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केलं. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी मर्ग दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार मरसकोल्हे करीत आहेत.
शेतकरी वडिलांचं स्वप्न राहिलं अपूर्ण
मृतक हिमांशु यांचे वडील हे शेतकरी आहेत. ते म्हातारी आई, पत्नी आणि दोन मुलांसह राहतात. हिमांशु हा शिकून मोठा अधिकारी बनावं असं स्वप्न वडिलांनी बघितलं होतं. त्यामुळं हिमंशुला वेळोवेळी ते अभ्यासाबाबत बोलत असे, मात्र मुलाने टोकाचं पाऊल उचलून जीवन संपविलं.
अल्पवयीन मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढू लागले आहे. पालकांनी हटकल्याने, मोबाईल वापरास नकार दिल्याने मुलांनी टोकाचे पाऊल उचलले असल्याच्या घटना शहरी भागात समोर आल्या आहेत. आता, ग्रामीण भागातही अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
एकाच झाडाच्या फांदीला दोन जिवलग मित्रांची एकाचवेळी गळफास घेत आत्महत्या
कोल्हापूर जिल्ह्यात आत्महत्यांची भयावह मालिका सुरुच आहे. आता हातकणंगले तालुक्यात दोन जिवलग मित्रांनी एकाच झाडाला एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकाराने कोल्हापूर जिल्हा हादरून गेला आहे. हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकादमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघा मित्रांनी एकाच दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर तालुक्यासह कोल्हापूर जिल्हा हादरला. ही घटना 3 एप्रिल रोजी घडली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
