5 लाखांचा हुंडा द्या अन्यथा आमचे नक्षल्यांशी संबंध.., 60 दिवसाच्या आताच नवविवाहितेला..भंडाऱ्यात धक्कादायक प्रकार
Bhandara Crime: हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Bhandara: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजं असतानाच राज्यभरातून हुंडा, घरगुती हिंसाचार, छळवणुकीचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. मुलीला सासरी सुखात ठेवायचं असेल तर, 5 लाखांचा हुंडा द्या,अन्यथा तुमच्या मुलीला घरी परत घेऊन जा. आमचे नक्षल्यांशी संबंध असून तुम्ही पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबाला ठार करू, अशी धमकी देत नागपूरच्या सासरकडील मंडळींनी नवविवाहितेला लग्नाच्या अवघ्या 60 दिवसात अंगावरील कपड्यांसह घरातून हाकलून लावल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा संतापजनक प्रकार भंडारा येथील वैभवीसोबत घडला असून पीडितेच्या तक्रारीनंतर पतीसह सासू, सासरे आणि नणंदेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Crime News)
लग्नानंतर सुरू झाला हुंड्याचा तगादा
भंडाऱ्याच्या प्रतीक तांबोळी यांची मानसकन्या वैभवी हिचा विवाह 19 जानेवारी रोजी नागपूरच्या शांतीनगर येथील मुदलियार लेआऊटमधील अभिषेक उर्फ घुनेश्वर डेकाटे (28) याच्याशी झाला होता. लग्नाच्या काही दिवसांतच पती अभिषेक, सासरे राजेंद्र (55), सासू माधुरी (49) आणि नणंद नंदिनी (23) यांनी वैभवीवर 5 लाख रुपयांच्या हुंड्यासाठी तगादा सुरू केला. हुंड्यासाठी तिचा सतत्याने मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. हुंडा न मिळाल्यामुळे वैभवीला 20 मार्चला सासरून अंगावरील कपड्यांसह घराबाहेर काढण्यात आलं. त्यानंतर तिचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूरला गेले असता, सासरच्यांनी “5 लाख रुपये द्या, नाहीतर तुमच्या मुलीला घेऊन जा” असं स्पष्ट सांगितलं. एवढ्यावरच न थांबता, “आमचे नक्षल्यांशी संबंध आहेत, पोलिसात गेला तर तुमच्या कुटुंबाला ठार करू” अशीही धमकी दिली गेली.
भंडारा पोलिसात गुन्हा दाखल
या सगळ्या प्रकारानंतर वैभवीचे वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती अभिषेक, सासू माधुरी, सासरे राजेंद्र आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. वैभविचे कुटुंबीय तडजोडीसाठी नागपूर येथे सासरी गेले असता, त्यांना 5 लाख रुपये द्या, तरचं मुलगी नांदवू असे सांगतानाचं आमचे नक्षाल्यांशी संबंध असून पोलिसात गेल्यास तुमच्या कुटुंबियांना ठार करू अशी, धमकी दिली. याप्रकरणी नवविवाहितेचे मानस वडील प्रतीक तांबोळी यांनी भंडारा पोलिसात वैभवीच्या सासरकडील मंडळी विरोधात भंडारा पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पती अभिषेक, सासरे राजेंद्र, सासू माधुरी आणि नणंद नंदिनी यांच्या विरोधात हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा:


















