एक्स्प्लोर

Beed Crime : पैशाच्या व्यवहारावरून वाद, परळीतील तरुणाला मित्रांनीच संपवलं अन् रेल्वे रुळावर फेकलं; 48 तासांमध्ये पोलिसांकडून छडा

Beed Parli Crime : मृत तरुणाने मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचं कुटुंबाला सांगितलं आणि दोन दिवसानंतर त्याचं प्रेत रेल्वे रुळावर आढळलं. त्यामुळे त्याने स्वतःचं जीवन संपवल्याची चर्चा सुरू होती. 

बीड : जिल्ह्यातील परळी येथे एका 36 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह रेल्वे रुळावर सापडल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा प्रकार आत्महत्या किंवा रेल्वे अपघात असल्याचा संशय व्यक्त केला जात होता. मात्र, बीड पोलिसांनी अत्यंत कौशल्यानं तपास करत अवघ्या 48 तासांच्या आत या भीषण खुनाचा उलगडा केला आहे. केवळ पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून या तरुणाची हत्या करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

या प्रकरणी पोलिसांनी कट रचून खून करणाऱ्या दोन मित्रांना बेड्या ठोकल्या आहेत. अफजलखान ऊर्फ तोहीद पठाण (वय 36) असं खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. तो परळी शहरातील सरदारनगर भागातील रहिवासी होता. या प्रकरणी पोलिसांनी त्याचेच जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांना ताब्यात घेतले असून, पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत अफझलखान याने आपल्या कुटुंबाला मी मित्रांसोबत बाहेरगावी जात असल्याचं सांगितलं होतं. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवस त्याचा कुटुंबीयांशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. दरम्यान, दोन दिवसांनंतर अचानक परळीतील लेंडेवाडी शिवारात असलेल्या रेल्वे रुळाच्या पटरीवर अफझलचा मृतदेह आढळून आला. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

Beed Police Investigation : सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाने तपास

सुरुवातीला घटनास्थळाची परिस्थिती पाहता हा रेल्वे अपघात किंवा आत्महत्येचा प्रकार असावा असंच चित्र दिसत होतं. परंतु, परळी पोलिसांना हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय आला. त्यांनी तातडीने गुप्त माहिती मिळवून तपासाची चक्रे गतिमान केली. पोलिसांनी संशयाच्या आधारे अफझलचे जवळचे मित्र ऋषिकेश फड आणि गौरव व्यास या दोघांना ताब्यात घेतले. सुरुवातीला या दोन्ही आरोपींनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) केलं असता, पोलिसांचा संशय अधिक बळावला. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी जेव्हा दोन्ही संशयितांना खाक्या दाखवला, तेव्हा त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

Extortion Money Dispute : दगडाने ठेचून संपवलं

आरोपी ऋषिकेश फड आणि गौरव व्यास यांचा अफझलसोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून जुना वाद सुरू होता. याच पैशांच्या कारणावरून दोघांनी अफझलचा काटा काढण्याचा पूर्वनियोजित प्लॅन आखला होता. बाहेरगावी नेण्याच्या बहाण्याने दोघांनी अफझलला गाठलं आणि निर्जन स्थळी नेऊन त्याच्या डोक्यात व अंगावर दगडाने जबर मारहाण करून त्याचा निर्घृण खून केला.

हत्या केल्यानंतर हा खून नसून अपघात किंवा आत्महत्या आहे असं भासवण्यासाठी दोघांनी मिळून अफझलचा मृतदेह लेंडेवाडी शिवारातील रेल्वे रुळावर आणून फेकला आणि तिथून पळ काढला. 

बीड पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परळी शहरात मित्रांच्याच विश्वासघाताची मोठी चर्चा सुरू असून, पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नंदूरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल
नंदूरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर, भाजपाचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल
Ambernath crime: अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद
अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद
Mumbai Protest Girl Riya Ahir: एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
एकटीनं पोलिसांची गाडी रोखून धरली, मुंबईतील आंदोलनाचा चेहरा झालेली रिया अहिर नेटकऱ्यांमुळे संतापली; थेट पोलीस स्टेशन गाठलं, नेमकं काय घडलं?
MPSC Paper Leak: MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
MPSC औषध निरीक्षक पेपर लीक प्रकरणात मोठा ट्विस्ट; 'ती' तक्रारच बनावट? पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून रचला बनाव?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
अमेरिका- इराणच्या एका निर्णयानं शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स निफ्टीत उसळी, गुंतवणूकदारांची 5 लाख कोटींची कमाई
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
24 वर्षांनी मायेच्या सावलीत, लेक परतला आईच्या कुशीत; SIR यादी पडताळणीतून उलगडा, अश्रूंचा बांध फुटला
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
बिहार बंद आंदोलनात विद्यार्थ्यांवर एसपीच्या बॉडीगार्डचा थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी; प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहोचलं, राहुल गांधी म्हणाले, 'संपूर्ण व्यवस्था घातक झालीय...'
Supreme Court on Delhi Police: 'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
'आंदोलन घटनात्मक अधिकार, आंदोलनादरम्यान होणारी पोलिसांची क्रूरता समर्थनीय नाही..' दिल्ली पोलिसांच्या 'चलो संसद' आंदोलनातील अमानुष अत्याचारावर 'सुप्रीम' ताशेरे
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
भाविकाची 5 वर्षांपूर्वीची इच्छापूर्ती, शिर्डीतील साईबाबांचरणी चांदीची मूर्ती अर्पण; जाणून घ्या किंमत?
Sushma Andhare On MPSC : MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
MPSC पेपरफुटीची तक्रार करणारा 'तो' मुलगा नॉट रिचेबल, नेमका कशामुळे घाबरला? सुषमा अंधारेंचा खळबळजनक आरोप
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
'ऑपरेशनल लॅप्स'! रॅपिड ॲक्शन फोर्सने पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ, राहुल गाधींनी अमित शाहांना घेरलं असतानाच चौकशीतून धक्कादायक माहिती
Nitin Gadkari ethanol: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता E 20 पार्टीची स्थापना, नितीन गडकरींचं मोठं पाऊल, मुंबई हायकोर्टाचाही महत्त्वाचा निर्णय
Embed widget