एक्स्प्लोर

Ambernath crime: अंबरनाथमध्ये भयंकर घडलं, दबक्या पावलाने आला अन् 12 व्या मजल्यावरुन मांजरीला ढकललं, घटना CCTVत कैद

Ambernath crime News: अंबरनाथमध्ये मांजरीला 12 व्या मजल्यावरून ढकललं! पालेगाव परिसरातील घटना सीसीटीव्हीत कैद.

Ambernath crime Cat Thrown: अंबरनाथमध्ये (Ambernath) माणुसकीला (Crime News) काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.  पालेगाव परिसरात 12  मजल्यावरुन एका मांजरीला ढकलण्यात आलं.  ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. याचा धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  या व्हिडीओत एक माथेफिरू व्यक्ती इमारतीच्या डक्टमधून मांजरीला ढकलून देत असल्याचं दिसत आहे.  मांजर (Cat Thrown) खाली पडली की नाही, हे त्याने वाकूनही पाहिलं. यानंतर तो व्यक्ती निघून जातो. या घटनेत मांजरीचा मृत्यू होतो. दरम्यान, या प्रकरणी आता माथेफिरू व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

अंबारनाथमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली (Animal Cruelty in Ambernath)

अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात रॉयल फ्लोरा इमारतीत हा सर्व प्रकार घडला. इमारतीच्या ए विंग मधील 12 व्या मजल्यावर ही घटना घडली असल्याची माहिती आहे. काल म्हणजेच रविवारी 26 जुलै रोजी  पावणेसहा वाजताच्या दरम्यान, एक मांजर 12 व्या मजल्यावरील डक्टच्या भिंतीवर चालत होती. यावेळी एक माथेफिरू व्यक्ती दबक्या पावलाने तिथे येतो.  माथेफिरू व्यक्ती वयस्कर दिसत असून, तो मांजरीला डक्टवरुन खाली ढकलून दिलं. त्या व्यक्तीच्या हातात रुमाल देखील दिसत आहे.

यानंतर मांजर खाली पडली आहे की नाही, हे तो वाकून पाहतो. त्यानंतर तो तेथून निघून जातो.  माथेफिरू व्यक्ती जस जसं मांजरीच्या जवळ जातो, तशी मांजर घाबरते. काही समजाच्या आत तो मांजरीला ढकलतो. हा संपूर्ण प्रकार रॉयल फ्लोरा इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या व्हिडीओत ही घटना स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, ही घटना सकाळच्या सुमारास घडल्यामुळे इमारतीच्या आवारात कुणीही दिसत नाहीये. 

12 व्या मजल्यावरील सगळ्या रुमचे दरवाजे बंद आहेत.  त्यामुळे माथेफिरू व्यक्ती हे धक्कादायक कृत्य करु शकला.  या घटनेत मांजरीचा मृत्यू झाला असून, याची माहिती मिळताच इमारतीतील  रहिवासी संतापले आहेत.   या प्रकरणी आता प्राणी संरक्षण कायद्यानुसार या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.  मात्र या व्यक्तीने मांजरीला का ढकललं?  मांजरीला 12 व्या मजलीवरुन ढकलण्यामागचं कारण काय? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, ही घटना समोर येताच इमारतीतील रहिवासी आणि परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सीजीपीच्या आंदोलनात अभिनवची चर्चा, रातोरात झाला नॅशनल क्रश; 'तो' इन्फ्ल्युएंसर आहे तरी कोण?

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli: कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
सांगलीच्या कुपवाडमध्ये कचरा टाकण्याच्या वादातून महिलेचा बळी घेतला, पतीवरही जीवघेणा हल्ला; आमदार गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, आरोपीचा एन्काऊंटर करा..
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Embed widget