एक्स्प्लोर

Beed Crime Vilas Ghule Case: 'संबंध ठेव नाहीतर नवरा-लेकरांना मारून टाकू, उमेश मानेवर महिलेचे सनसनाटी आरोप; बीडमधील 'त्या' प्रकरणाला धक्कादायक वळण

Beed Crime Vilas Ghule Case: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे 10 जूनच्या रात्री झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे 10 जूनच्या रात्री झालेल्या विलास घुले हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक वळण मिळाले आहे. या हत्येमागे केवळ वाद सोडवण्याचा विषय नसून, महिला छळ, ब्लॅकमेलिंग आणि अत्याचाराचे गंभीर कारण असल्याचा खळबळजनक आरोप एका स्थानिक महिलेने केला आहे. विलास घुलेचा मित्र उमेश माने याने आक्षेपार्ह व्हिडिओ काढून आपल्याला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केल्याचा दावा या महिलेने केला आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् पोलिसांत जाण्यापासून रोखले

पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, संशयित उमेश माने याने तिच्यावर जबरदस्ती करत अत्याचार केला आणि त्याचे व्हिडिओ बनवले. हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिला वारंवार ब्लॅकमेल केले. जेव्हा या त्रासाचा अतिरेक झाला, तेव्हा तिने हा प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. कुटुंबिय पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असतानाच, रमेश घुले याने त्यांना मध्यस्थी करत धमकावले. "यापुढे असा त्रास होणार नाही, याची जबाबदारी माझी. पण जर तुम्ही पोलिसांत गेलात तर तुमचे काही खरे नाही," अशी धमकी रमेश घुलेने दिल्याने कुटुंब भीतीच्या छायेत होते. या त्रासाला कंटाळून हे कुटुंब शेतातील घर सोडून गावात राहायला गेले.

Beed Crime Vilas Ghule Case: 3 जून रोजी नवऱ्याला आणि मुलांना मारण्याची धमकी

गावात राहायला गेल्यानंतरही विलास घुले आणि उमेश माने यांचा त्रास थांबला नाही. ते बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने येऊन सतत छळ करायचे. 3 जून रोजी विलास घुले याने महिलेला धमकी दिली की, "तू पूर्वीसारखेच संबंध ठेव, नाहीतर तुझ्या लेकरांना आणि नवऱ्याचा जीव घेईल." त्यानंतर 20 जूनच्या रात्री विलास आणि उमेश पुन्हा तिच्या घरासमोर आले. गाडीचा हॉर्न वाजवून त्यांनी शिवीगाळ सुरू केली. महिलेच्या पतीने "आम्हाला सुखाने जगू द्या" अशी विनंती केली असता, "तू बाहेर ये, तुला खल्लास करतो," अशी धमकी त्यांनी दिली.

Beed Crime Vilas Ghule Case: ...अन् हॉटेलवर घडले हत्याकांड!

या त्रासातून मार्ग काढण्यासाठी आणि त्यांना समजावून सांगण्यासाठी महिलेचे वडील, पती आणि इतर नातेवाईक हॉटेलवर गेले होते. मात्र, तिथे विलास आणि उमेश यांनी काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी या कुटुंबाला बेदम मारहाण सुरू केली. "त्यांनी आधी मारहाण सुरू केल्यामुळे स्वतःच्या बचावासाठी माझ्या वडिलांनी हात उचलला आणि त्यातूनच विलास घुलेचा मृत्यू झाला," असा दावा महिलेने केला आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. "आम्ही केज आणि बीड पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यासाठी गेलो होतो, मात्र पोलिसांनी अजूनही आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही. पोलिसांनी आमची बाजू ऐकून आम्हाला न्याय द्यावा," अशी मागणी पीडितेने केली आहे. तर या प्रकरणी अद्याप पोलिसांनी तक्रार घेतलेली नाही, अशी माहिती महिलेने दिली आहे.

Beed Crime Vilas Ghule Case: नेमकं काय आहे मूळ प्रकरण?

20 जूनच्या रात्री केज तालुक्यातील टाकळी येथे हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेले विलास घुले या तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा संतप्त झाला होता. मुख्य आरोपींच्या अटकेसाठी तीन दिवस रास्ता रोको करण्यात आला होता, तसेच विलास यांचा मृतदेह तब्बल नऊ तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवला होता. पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास करत आतापर्यंत 9 आरोपींना अटक (Arrest) केली आहे. मात्र, आता या नवीन खुलाशामुळे पोलिसांसमोर तपासाचे नवीन आव्हान उभे राहिले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Dhananjay Munde : विलास घुले प्रकरणातील दहावा आरोपी पोलिसांचा लाडका आहे का? धनंजय मुंडे आक्रमक, बीडमध्ये 22 खून झाल्याची खंत 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
बालकांच्या शोषणाशी संबंधित अश्लील व्हिडिओंचा काळाबाजार, रॅकेट चालवणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक 
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
गडचिरोलीत नक्षलवादावर आणखी एक घाव! हल्ल्याच्या उद्देशाने जमिनीत पुरलेला माओवाद्यांचा मोठा शस्त्रसाठा जप्त
Pune Crime News : अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
अमानुष कृत्याचा कळस! 9 महिन्यांच्या बाळाच्या तोंडात ओतले फेविक्विक, पुण्यातील संतापजनक घटना
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
धक्कादायक! म्युल अकाउंटद्वारे 150 कोटींची फसवणूक, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून टोळीचा पर्दाफाश
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget