(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तपासणीसाठी गेलेल्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी परळीत कडकडीत बंद! फरार डॉक्टरच्या अटकेची मागणी
पोलिसांनी तपास करून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संबंधित डॉक्टर फरार असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आज परळी बंद पुकारण्यात आलाय.
Parali Crime: परळीत डॉक्टरनं तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी आज परळी बंदची हाक देण्यात आलीय. बीडच्या परळी शहरात एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढली आहे. यानंतर या डॉक्टर विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर परळीत वातावरण तापले आहे. परळी शहर कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली दुकान बंद ठेवून या बंदला पाठिंबा दिलाय. शुक्रवारी परळी शहरातील एका क्लिनिकमध्ये तपासणीसाठी गेलेल्या तरुणीचा डॉक्टर यशवंत देशमुख यांनी विनयभंग केला.याच प्रकरणात तरुणीसह तिच्या नातेवाईकांनी परळी पोलीस ठाणे गाठून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली. यादरम्यान मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.अखेर पोलिसांनी तपास करून पीडित तरुणीच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर संबंधित डॉक्टर फरार असून त्याच्या अटकेच्या मागणीसाठी आज परळी बंद पुकारण्यात आलाय.
परळीत वातावरण तापले
बीडच्या परळी शहरातील एका डॉक्टराकडे तपासणीसाठी गेलेल्या तरुणीची छेड काढल्या प्रकरणी परळीतील वातावरण तापले होते. तरुणीच्या नातेवाईकांसह मोठ्या संख्येने जमाव परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर जमला होता. परळी शहरातील डॉक्टर यशवंत देशमुख यांचे जनरल फिजिशियन हॉस्पिटल आहे. याच हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेलेल्या तरुणीचा विनयभंग केल्याचा आरोप तरुणीने केला. याच प्रकरणावरून पीडित तरुणीला न्याय मिळावा.. या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस ठाण्याबाहेर जमला होता.. अखेर पोलिसांनी तपास करून डॉक्टर यशवंत देशमुख यांच्या विरोधात कलम 74,75( 2) 79,3,1, नुसार गुन्हा दाखल केलाय.
हेही वाचा:
Beed Crime : परळीत फिजिशियन डॉक्टरकडून रुग्णालयात तरुणीची छेड, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल