एक्स्प्लोर

काय सांगता! लसणाच्या पिकात चक्क अफूची शेती; तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Aurangabad Crime: पठ्ठ्यानं कमालच केली. लसणाच्या पिकात चक्क अफूची शेती केली. तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Aurangabad Crime News: औरंगाबाद (Aurangabad) ग्रामीणच्या पाचोड पोलिसांनी (Pachod Police) मोठी कारवाई करत चक्क अफूची शेती करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहे. पैठण तालुक्यातील गाव तांडा खुर्द शिवारात एका शेतात पोलिसांनी छापा टाकून अफूची 250 झाडे जप्त असून, यात दोन लाख 14 हजार 774 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यात एका शेतकऱ्याला ताब्यात घेतले असून पाचोड  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रामभाऊ गोर्ड असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोड पोलीस ठाणे हद्दीतील गाव तांडा खुर्द येथील शेतकरी रामभाऊ गोर्ड यांनी त्यांच्या शेतात अफूच्या झाडांची लागवड केली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने कारवाईसाठी पोलीस पथक तयार केले. दरम्यान, गुरुवारी (23 फेब्रुवारी) दुपारी पथकाने गावतांडा खुर्द शिवारातील शेतीवर छापा टाकला. यावेळी संशयित रामभाऊ गोर्ड यांच्या शेत (गट नंबर 27) शेताच्या मधोमध गहू आणि लसूण पिकाच्या आडोशाला अफूच्या झाडांची लागवड केल्याचे दिसले. यावेळी बअर्धा गुंठा जागेत अफूचे पीक घेतल्याचे पथकाच्या पाहणीत समोर आले. त्यामुळे कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांनी पंचनामा करत गुन्हा दाखल केला आहे.

दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी यावेळी केलेल्या पाहणीत शेतातून पूर्ण वाढ झालेली दोन ते अडीच फूट उंचीची अफूची 250 झाडे आढळून आली. ज्याची अंदाजे किंमत दोन लाख 14 हजार 774 रुपये आहेत.  याप्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. तर पुढील तपास पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल पा. नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक माने यांच्यासह कर्मचारी करीत आहे.

पीक लावून चार-पाच महिने झाल्याचा अंदाज 

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अफूच्या झाडांची उंची दोन-अडीच फूट असल्याचं समोर आले आहे. त्यामुळे हे पीक लावून किमान चार ते पाच महिने झाल्याचा अंदाज आहे. तर झाडांची वाढ पूर्णपणे झाली असून, पीक काढणी आधीच पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा केला असून, गुन्हाही दाखल केला आहे. तर आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. मात्र या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saleel Kulkarni on Election : तक्रार नंतर करा आधी मतदान करा! सलील कुलकर्णींचं तरुणांना आवाहनJay Pawar Shrinivas Pawar: दादांचा लेक लाखात एक..!भर रस्त्यात जय पवारांचा श्रीनिवास पवारांना नमस्कारVotting Superfast | विधानसभेसाठी मतदान, राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवरCM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
कसबा बावड्यात तणावाचं वातावरण, शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची बाचाबाची; सतेज पाटीलही पोहोचले
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
मतदान केंद्रावर रामदास आठवलेंसोबत 'भेदभाव'; रिपाईचे कार्यकर्ते संतापले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Assembly Election 2024 : भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
भाईंदरमध्ये नरेंद्र मेहता अन् गीता जैन समर्थकांमध्ये बाचाबाची, पोलिसांची वेळीच मध्यस्थी अन्यथा...
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Karmala constituency: मनोज जरांगे पाटील यांचा फोटो ठेवून तुतारीला मतदान, करमाळा तालुक्यातील व्हिडीओ व्हायरल
Chhagan Bhujbal : मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मी उमेदवार आहे, मी कुठंही जाऊ शकतो! छगन भुजबळांना विरोधकांनी घेरलं, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
मोठी बातमी : बीडमध्ये मतदान केंद्रावर उमेदवाराचाच मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, कार्यकर्त्यांना धक्का
Maharashtra assembly election Voting turnout 2024: राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
राज्यातील 30 मतदारसंघांमध्ये खटाखट मतदान, मेट्रो सिटीवाल्यांपेक्षा गावकऱ्यांनी लोकशाहीचा आब राखला
Voting Percentage in Mumbai City : मुंबई शहर जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत माहीममध्ये सर्वाधिक तर कुलाबा मतदारसंघात कमी मतदान, जाणून घ्या आकडेवारी
मुंबई शहरमधील 10 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत किती टक्के मतदान, जाणून घ्या आकडेवारी? 
Embed widget