मोठी बातमी! अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं निधन; समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात
Accident News: भीषण अपघातात 'शिवनिका ट्रस्ट'चे उपाध्यक्ष आणि अशोक खरात याचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात असताना धोत्रे गावाजवळ उभ्या असलेल्या कंटेनरला कारने पाठीमागून भीषण धडक दिली. या भीषण अपघातात अशोक खरातच्या (Ashok Kharat) 'शिवनिका ट्रस्ट'चे उपाध्यक्ष आणि खरात (Ashok Kharat) 'याचे अत्यंत निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Accident News) ते संभाजी नगरहून शिर्डीला जात असताना समृध्दी महामार्गावरती त्यांच्या कारचा अपघात झाल्याची माहिती आहे.(Accident News)
Accident News: कंटेनरखाली घुसली कार
मिळालेल्या माहितीनुसार, शेळके आपल्या कुटुंबासह कारने प्रवास करत होते. धोत्रे गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका कंटेनरचा अंदाज न आल्याने त्यांची कार थेट कंटेनरच्या मागील भागात घुसली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चक्काचूर झाला असून जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Ashok Kharat) '
Accident News: कुटुंबीयांची प्रकृती चिंताजनक
या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकलेली होती, त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते.
Accident News: खरातचा विश्वासू सहकारी
जितेंद्र शेळके हे गेल्या काही दिवसांपासून लैंगिक शोषण आणि अनेक बड्या नेत्यांना, अधिकाऱ्यांना लुबाडल्याने चर्चेत आलेल्या अशोक खरातचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. खरात याच्या 'शिवनिका ट्रस्ट'चे ते उपाध्यक्ष म्हणून काम पाहत होते. याशिवाय, शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरात याची भागीदारी असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके मोठ्या मानसिक तणावाखाली होते, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका बाजुला उभ्या कंटेनरला कारची पाठीमागून धडक दिली असल्याची माहिती आहे. कार थेट कंटेनरखाली घुसली आहे. या अपघातात जितेंद्र शेळकेंचा मृत्यू तर पत्नी आणी मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल आहे. पत्नी अजूनही गाडीत अडकली असल्याची माहिती मिळत आहे.
Accident News: जितेंद्र शेळके कोण?
जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे शेळके उपाध्यक्ष राहिले आहेत. शेळकेंच्या लाॅन्समध्येही खरातची भागिदारी होती. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते






















