एक्स्प्लोर

Ashok Kharat Case: अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी; सरकारी आणि आरोपीच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, न्यायालयात काय काय घडलं?

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात याचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला असून, न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याचा जेलमधील मुक्काम आणखी वाढला असून, न्यायालयाने त्याला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. यापूर्वी दुसऱ्या गुन्ह्यातील 7 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज त्याला न्यायालयात (Court) हजर करण्यात आले होते.  

दरम्यान, दुसऱ्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, लगेचच एसआयटीने तिसऱ्या गुन्ह्यात त्याचा ताबा घेतला. सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेला हा तिसरा गुन्हा अत्यंत गंभीर असून, एका 7 महिन्यांच्या गरोदर महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप खरातवर आहे. प्रसूती सुरळीत व्हावी आणि मुलगाच होईल, असे आमिष दाखवत त्याने महिलेवर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणाची सुनावणी न्यायाधीश श्रीमती बी. एन. इचपुराणी यांच्या न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली. आरोपी अशोक खरातला व्हीसीद्वारे हजर करण्यात आले. न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान तपास अधिकारी अमोल भारती यांनी गुन्ह्याचे स्वरूप स्पष्ट करत फिर्याद वाचून दाखवली.

Ashok Kharat Case: काय म्हणाले तपास अधिकारी?

तपास अधिकाऱ्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी लोकांना नकली साप आणि वाघ दाखवून घाबरवत असे. तसेच मंतरलेले खडे, चिंचोके विकून फसवणूक करत होता. महिलांना काही द्रव्य किंवा पेढे खाऊ घालून अत्याचार केल्याचा संशय असून, त्या पदार्थांमध्ये काय मिसळले जात होते, याचा तपास करणे आवश्यक आहे. तसेच नकली साप, वाघ आणि इतर साहित्य तो कुठून आणत होता, याचाही तपास बाकी असल्याचे त्यांनी सांगितले.

Ashok Kharat Case: सरकारी वकिलांचा युक्तिवाद

सरकारी वकिलांनीही तपासासाठी कोठडीची गरज अधोरेखित केली. आरोपीकडून पेनड्राईव्ह जप्त केला आहे. लॅपटॉप जप्त केला आहे. त्यासाठी आरोपीला समोर बसवून तपास करायचा आहे.  अनेक महिला पुढे आल्या आहेत. नकली खडे महेश कलंत्री यांच्याकडून अशोक खरात घेत होता ते तपास करायचे आहे. द्रव कुठून आणत होता? नकली वाघ, नकली साप कुठून आणत होता? त्याचा तपास करायचा आहे. आरोपी हा हुशार आहे तो तपासात सहकार्य करत नाही. त्यासाठी तपास करायचा आहे, असे त्यांनी म्हटले. 

Ashok Kharat Case: आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद

दुसरीकडे, आरोपीचे वकील सचिन भाटे यांनी पोलीस कोठडीला विरोध करत, याआधीच एसआयटीकडून सखोल तपास सुरू असल्याचे सांगितले. चिंचोके, खडे, नकली साप, नाग हे विषय याधी देखील येऊन गेले आहेत. आरोपीचा एसआयटी तपास करत आहे. त्यामुळे पुन्हा कोठडीची गरज काय?  सातव्या महिन्यात महिला आरोपीला पहिल्यांदा भेटल्या. त्यानंतर पुन्हा त्या महिलेवर अत्याचार केला आहे. एक नोव्हेंबर 2025 ते डिसेंबर 2025 हा गुन्ह्याचा कालावधी आहे, असे म्हणतात. पहिल्या गुन्ह्यात पेनड्राईव्ह आम्ही तयार केला व्हिडीओ आहेत, असे म्हटले होते. आता पुन्हा पेनड्राईव्ह कसा रिकव्हर करणार? आता अधिकारी बदलले आहेत. आधी दोन गुन्ह्यात वेगळे आरोपी होते. एसआयटीने पत्रकार परिषद घेतली. त्यात 9 गुन्हे नोंदवले असे म्हटले. 11 गुन्ह्याचा तपास एसआयटी करत आहे, अस सांगतात. त्यामुळे आता पुन्हा नवीन कोठडीची गरज नाही, असे त्यांनी नमूद केले. 

Ashok Kharat Case: खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी

सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी प्रत्युत्तर देताना प्रत्येक गुन्हा स्वतंत्र असून, त्यासाठी वेगळी चौकशी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. न्यायालयानेही तपास अधिकाऱ्यांना घटनेच्या कालावधीबाबत विचारणा केली असता, 2023 पासून विविध महिलांबाबत अशा घटना घडत असल्याची माहिती देण्यात आली. शेवटी न्यायालयाने आरोपी अशोक खरातला विचारले असता, त्याने काहीही सांगण्यास नकार देत हात जोडले. सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला तिसऱ्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

आणखी वाचा 

Ashok Kharat Crime News: तुला मुलगाच होईल...गर्भवती महिलेला नको नको ते सांगून अशोक खरातकडून लैंगिक शोषण; आता गावकऱ्यांनीही सांगितली हादरवणारी माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
मुलीसोबत बोलताना व्हिडीओ काढल्याचा राग आला, डोक्यात कोयता घालून दुसऱ्या मजल्यावरुन ढकललं, नाशिकमधील धक्कादायक घटना
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Washim Crime Couple death: आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं
आंतरजातीय लग्नाला घरच्यांकडून विरोध, वाशिमच्या प्रेमी जोडप्याने मोर्णा तलावात एकत्रच उडी मारुन आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget