एक्स्प्लोर

Ashok Kharat Case Nashik Crime News: ईशानेश्वर मंदिर, कार्यालय ते फार्महाऊस... अशोक खरातच्या मालमत्तांची ED कडून झाडाझडती, आज पुन्हा कोर्टात हजर करणार

Ashok Kharat Case Nashik Crime News: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदू अशोक खरात याच्याभोवती आता सक्तवसुली संचालनालयाने आपला फास आवळला आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आणि भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याच्याभोवती आता सक्तवसुली संचालनालयाने (ED) आपला फास आवळला आहे. एसआयटीच्या (SIT) कारवाईनंतर आता ईडीने या प्रकरणात उडी घेतली असून, खरातच्या विविध मालमत्तांची तपासणी सुरू केली आहे. दुसरीकडे, पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने खरातला आज पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या बेकायदेशीर संपत्तीचा शोध घेण्यासाठी ईडीच्या पथकाने एसआयटी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये ईशानेश्वर मंदिर, खरातचे कार्यालय, फार्म हाऊससह विविध ठिकाणच्या जमिनीच्या भूखंडांची पाहणी करण्यात आली. 

Ashok Kharat Case Nashik Crime News: प्रॉपर्टीची मोजणी आणि सध्याच्या बाजारमूल्याचा तपास

तपास यंत्रणांकडून सध्या या मालमत्तांची मोजणी सुरू असून, त्यांचे सध्याचे बाजारमूल्य किती आहे, याचा अंदाज घेतला जात आहे. विशेष म्हणजे, खरातने एवढी मोठी मालमत्ता कोणत्या उद्देशाने जमा केली आणि काही विशिष्ट मालमत्तांमध्ये 'पार्टनर्स' का घेतले? याचा सखोल तपास ईडी करत आहे. या व्यवहारांमध्ये मनी लाँड्रिंग झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खरातची बँक खाती आधीच सील करण्यात आली असून, त्यातील संशयास्पद व्यवहारांचे विश्लेषण सध्या सुरू आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: आज पुन्हा न्यायालयासमोर हजेरी

अशोक खरातला तिसऱ्या गुन्ह्यात सुनावण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यामुळे त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने (Video Conferencing) पार पडण्याची शक्यता आहे.

Ashok Kharat Case Nashik Crime News: चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीच्या मागणीची शक्यता

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटी आतापर्यंत झालेल्या तपासाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करणार आहे. खरातवर दाखल असलेल्या चौथ्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी, यासाठी तपास यंत्रणा न्यायालयाकडे विनंती करण्याची दाट शक्यता आहे. खरातने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक करून किती कोटींची माया जमवली, याचे धागेदोरे आता हळूहळू समोर येत आहेत. ईडीच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून, अनेक बड्या धेंडांचे धाबे दणाणले आहेत.

आणखी वाचा 

Ashok Kharat : नाशिक, शिर्डी, पुणे अन् आता सोलापूर; अशोक खरातने शक्तीपीठ महामार्ग जाणाऱ्या परिसरात घेतली 11 एकर जमीन, किंमत 2 कोटी 41 लाख अन्...

महत्त्वाच्या बातम्या

Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget