Amravati Crime: धक्कादायक! भिक्षेकरी बाबाने केला महिलेवर त्रिशूळाने वार; संतत्प नागरिकांनी बाबाला थेट विजेच्या खांबाला बांधले
Amravati Crime: चिखलदरा तालुक्यातील वस्तापुर गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भिक्षेकरी बाबाला भिक्षा न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या बाबाने एक महिलेवर त्रिशूळाने हल्ला केला आहे.
Amravati Crime अमरावती : चिखलदरा तालुक्यातील वस्तापुर गावातून एक धक्कादायक बातमी पुढे आली आहे. भिक्षेकरी बाबाला भिक्षा न दिल्याच्या रागातून संतप्त झालेल्या बाबाने एक महिलेवर त्रिशूळने प्राणघातक हल्ला (Crime) केला आहे. ठकीबाई सोनूजी हेकडे (60) असे या वृद्ध महिलेचे नाव असून त्यांच्या पोटावर हा त्रिशूळने वार (Amravati Crime) करण्यात आला आहे. '
या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्यानंतर ही बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असता, गावकरी एकत्र गोळा झालेत आणि गावातील मुख्य चौकातील इलेक्ट्रिक खांबाला या भिक्षेकरी बाबाला बांधून ठेवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी ही माहिती मिळताच पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेऊन या बाबाला अटक करत पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
बाबाने महिलेवर केला चक्क त्रिशूळाने वार
चिखलदरा तालुक्यातील वस्तापूर या गावात रविवारच्या पहाटेपासून उत्सव, भजनकीर्तन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, दुपारपर्यंत गावात सर्व गावकरी आणि भक्तगण श्रीसंत गजानन महाराजांच्या कार्यक्रमात व्यस्त होते. असे असतांना, नेमके याच वेळेत दुपारी तीन वाजताच्या सुमारास एक अज्ञात भिक्षेकरी बाबा हातात त्रिशुळ आणि बगलेत भलेमोठे गाठोडे घेऊन गावात भिक्षा मागत होता. दरम्यान, भिक्षा मागत असताना गावातील सोनूजी हेकडे यांच्या घरी हा बाबा पोहोचला आणि त्यांने भिक्षेची तसेच पैशाची मागणी केली. त्यानंतर घरातील ठकीबाई हेकडे यांनी बाबाला भिक्षा दिली. मात्र, दिलेल्या भिक्षेत पैसे न दिल्यामुळे बाबाचे समाधान झाले नाही. त्यानंतर बाबाने वयोवृद्ध ठकीबाई यांना बळजबरीने पैश्यांची मागणी केली. मात्र त्यांनी नकार देताच या बाबाने त्यांच्या सोबत वाद घातला.
बाबाला बांधले खांबाला
त्यानंतर या वादातून संतप्त झालेल्या भिक्षेकरी बाबाने आपल्या जवळ असलेल्या त्रिशूलने महिलेच्या पोटावर वार करून त्यांना जखमी केले. यात ठकीबाई यांच्या पोटावर त्रिशूळचा वार केल्याने त्या जखमी झाल्या. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. परिसरात जमलेल्या नागरिकांनी या महिलेला तत्काळ जवळील आरोग्य केंद्रात नेऊन उपचार सुरू केले. त्यानंतर नागरिकांनी या भिक्षेकरी बाबाचा शोध घेऊन त्याला शोधून काढले आणि गावातील मुख्य चौकात असलेल्या खांबाला कापडाच्या साह्याने बांधून ठेवले. कालांतराने ही बाब पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बाबाला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास चिखलदरा पोलीस करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या