संतापजनक! पोटच्या 24 वर्षीय पोरीवर बापानं लैंगिक अत्याचार केला, अमरावती पोलीस दलात काम करणारा बाप मुलीसाठी भक्षक ठरला
Amravati Crime News: अमरावती ग्रामीण पोलीस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत .पुढच्या पोरीसाठीच भक्षक झालेल्या नरधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत .

Amravati crime: अमरावतीत वडील मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका 24 वर्षीय तरुणीने आपल्या पोलिसात कार्यरत असणाऱ्या पित्याविरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस पित्याविरोधात बलात्कार विनयभंग पॉस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पिता अमरावती ग्रामीण पोलीस दलात कार्यरत आहेत. रक्षक असलेला पोलीस पिता आपल्या मुलीसाठीच भक्षक ठरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . (Crime News)
नेमके प्रकरण काय ?
अमरावतीत पुढच्या मुलीवर पोलीस पीठाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे .24 वर्षीय पीडित तरुणीने पोलीस पित्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे .या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस विभागाने तातडीने गुन्हा दाखल केला असून एकीकडे समाजात रक्षणकर्त्याची भूमिका निभवणाऱ्या पोलिसाचाच असा गृहस्पद चेहरा समोर आल्याने नागरिकांमध्ये ही संतापाची लाट उसळली आहे .राजपेठ पोलीस ठाण्यात आरोपी वडिलांविरोधात विनयभंग बलात्कार आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे .अमरावती ग्रामीण पोलीस दलात आरोपी वडील कार्यरत आहेत .पुढच्या पोरीसाठीच भक्षक झालेल्या नरधम बापाचा संतापजनक प्रकार घडल्यानंतर राजपेठ पोलीस अधिक तपास करत आहेत .
नराधमाने 37 वर्षीय महिलेशी ठेवले जबरदस्ती संबंध
सांस्कृतिक राजधानी आणि शिक्षणाचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुणे शहरात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका 40 वर्षीय नराधमानं एका 37 वर्षीय विवाहित महिलेला धमकावत लग्नाची मागणी घालत लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नराधम आरोपीने विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर तिचे फोटो आणि व्हिडीओ काढून घेतले. त्यानंतर काढलेले फोटो, व्हिडीओ तिच्या वडिलांना पाठवण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव टाकला. या घटनेनं संताप व्यक्त केला जात आहे. ही संतापजनक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली असून, पीडित महिलेने बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा
Nashik Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात, भरधाव कार थेट बंगल्यात घुसली; पाच जणांचा मृत्यू



















