एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गर्लफ्रेंडच्या हौसेसाठी झाला चोर, प्रियकरानं मालकाच्या दुकानात मारला डल्ला, व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे पोलिसांनी शोधला

Ambernath Latest Crime News : प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन खूश करण्यासाठी प्रियकर काहीही करायला तयार असतात. कधीकधी चोरीचा मार्गही अवलंबला जातो

Ambernath Latest Crime News : प्रेयसीला महागड्या भेटवस्तू देऊन खूश करण्यासाठी प्रियकर काहीही करायला तयार असतात. कधीकधी चोरीचा मार्गही अवलंबला जातो.. अशीच घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. प्रेयसीसाठी प्रियकरानं मालकाच्याच दुकानात चोरी केली. व्हॉट्सअॅप स्टेटसमुळे पोलिसांनी त्याचा शोध घेत बेड्या ठोकल्या. अंबरनाथ परिसरात या चोराची सध्या जोरदार चर्चा आहे. 

गर्लफ्रेंडला आयफोन घेऊन देण्यासाठी एका मजनूने जुन्या मालकाच्या दुकानात डल्ला मारल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. मात्र या चोरट्याने ठेवलेल्या व्हॉट्सऍप स्टेटसमुळे त्याच्यावर मालकाला संशय आला आणि पोलिसांनी त्याचा माग काढत त्याला बेड्या ठोकल्या. अंबरनाथ पश्चिमेला रेल्वे स्टेशनजवळ सुनील महाडिक यांचं ओम श्री साईराम अगरबत्ती भांडार हे अगरबत्ती आणि पूजा साहित्याचं दुकान आहे. या दुकानात राज आंबवले हा तरुण कामाला होता. मात्र तो आर्थिक अफरातफर करत असल्याचं लक्षात आल्यानं महाडिक यांनी त्याला कामावरून काढून टाकलं होतं. 

24 ऑगस्ट रोजी महाडिक यांनी सप्लायरला देण्यासाठी अडीच लाखांची रोकड घरून आणली होती. मात्र सप्लायर न आल्यानं ही रोकड ड्रॉव्हरमध्ये ठेवून ते घरी गेले. दुसऱ्या दिवशी ते दुकानात आले असता त्यांच्या दुकानाची ग्रील कापलेली आणि कुलूप तोडलेलं आढळून आलं. तर ड्रॉव्हर चावीने उघडून त्यातले दोन लाख रुपये आणि एक सोन्याची चेन चोरून नेल्याचं त्यांना आढळलं. त्यामुळे महाडिक यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, काही दिवसांनी महाडिक यांच्याकडे पूर्वी काम करणाऱ्या राज आंबवले याने त्याच्या व्हॉट्सऍप स्टेटसवर गर्लफ्रेंडला नवीन आयफोन आणि नवीन ऍक्टिव्हा स्कुटर घेतल्याचं स्टेटस टाकलं होतं. ते पाहून सुनील महाडिक यांना संशय आला. कारण महाडिक यांचा पैशाचा ड्रॉव्हर चावीने उघडून चोरी झाली होती. आणि ते ड्रॉव्हरची चावी कुठे ठेवायचे, हे फक्त राज आंबवले यालाच माहीत होतं. त्यामुळे महाडिक यांनी पोलिसांकडे याबाबतचा संशय व्यक्त करताच पोलिसांनी राज याला उचलून आणत त्याची पोलिसी खाक्या दाखवत चौकशी केली. 

यावेळी कामावरून काढल्याचा जुना राग आणि गर्लफ्रेंडला फोन, स्कुटर घेऊन द्यायची असल्यानं आपणच ही चोरी केल्याची कबुली त्यानं दिली. त्यामुळे त्याला अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Raj Thackeray Meeting : पराभव उमेदवारांसोबत राज ठाकरेंची बैठक, बैठकीत चर्चा काय?Ajit Pawar Finance Ministry  :  अर्थ मंत्रालय अजित पवारांनाच मिळाणार, सुत्रांची माहितीEKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget