Alibaug Murder : अलिबागमध्ये पर्यटकांमध्ये शिवीगाळ अन् मारामारी, एकाचा मृत्यू
Alibaug Crime : समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये हाणामारी झाल्यानंतर त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे.
रायगड : अलिबाग समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये हाणामारी झाली आणि त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला. शिवीगाळ का करतो अशी विचारणा केल्यानंतर हा वाद झाला आणि त्यामध्ये एकाचा जीव गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्यामध्ये एक तरुण गंभीर जखमी झाल्याचीही माहिती आहे. मितेश जनार्दन पाटील (वय 23) असं मृत तरुणाचं नाव असून तो पेणमधील रहिवासी आहे.
फिरायला गेलेल्या पर्यटकांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर हा हाणामारीचा प्रकार झाल्याचं समोर आलं. मृत तरुण हा जेएसडब्ल्यू कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून करत होता. मितेश हा आपल्या मित्रांबरोबर अलिबाग समुद्र किनाऱ्यावर फिरण्यासाठी आलेला असताना रात्री 12 वाजता हा संपूर्ण प्रकार घडला. या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलिस करत आहेत.
चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा खून
चेष्टा मस्करीतून झालेला वाद मित्राच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदनगर शहरातील मुकुंदनगर परिसरात दोन युवकांमध्ये झालेल्या चेष्टामस्करीत एका 20 वर्षीय युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
मुकुंदनगर परिसरात एका मेडिकलमध्ये दोन युवक एकमेकांची चेष्टा करत उभे असतांनाच शमसुद्दीन खान या आरोपीला चेष्टा सहन न झाल्याने त्याने जीशान खान या आपल्याच मित्रावर कात्रीने हल्ला चढवला. शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेनंतर जखमी जिशान खान याला शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान जिशान खान या युवकाचा मृत्यू झाला आहे.
या दोघांमधील भांडणाचा cctv व्हिडीओ आता समोर आला असून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याबाबत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर हल्ला करणारा आरोपी शमसुद्दीन खान हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, या घटनेची शहरात जोरदार चर्चा असून चेष्टा-मस्करीलाही मर्यादा असायला हव्यात, असाच सूर नागरिकांचा उमटत आहे.
ही बातमी वाचा: