एक्स्प्लोर

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांना शर्मिला ठाकरेंकडून घसघशीत इनाम जाहीर, किती पैसे मिळणार?

Badlapur Akshay Shinde Encounter: मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर महत्वाची माहिती दिली आहे.

Badlapur Akshay Shinde Encounter: बदलापूरमधील खासगी शाळेतील लैंगिक अत्याचार (Badlapur School Crime) प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा काल (23 सप्टेंबर) पोलिसांसोबत अचानक झालेल्या चकमकीत मृत्यू झाला.  या खळबळजनक घटनेनंतर विरोधकांनी पोलीस आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे काही राजकीय नेत्यांनी या घटनेचं समर्थन केलं आहे. 

मनसेचे नेते अविनाश जाधव (MNS Avinash Jadhav) यांनी सदर घटनेनंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जे झालं ते योग्य झालं, ज्या पद्धतीने ओरोपीने तीन-चार वर्षांच्या मुलीवर हात टाकताना मागेपुढे पाहिलं नाही. मी याआधी म्हटलं होतं, की आमचं सरकार असतं तर एन्काऊंटर केलं असतं. त्यामुळे झालेल्या घटनेचे आम्ही समर्थन करतो. शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांनी दोन्ही पोलिसांनी 51 हजार रूपये बक्षीस जाहीर केलं आहे. पैसे महत्त्वाचे नाहीत, परंतु याचं उत्तर असंच दिलं गेलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी दिली. 

नेमकं काय घडलं?

बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या अक्षय शिंदेला पोलिस तळोजा जेलमधून बदलापूर क्राईम ब्रान्चला घेऊन जात होते, त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदेने पोलिस कॉन्स्टेबलची बंदूक हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत एपीआय निलेश मोरे यांना लागली गोळी लागली. त्यानंतर  एपीआय निलेश मोरे यांनी स्वसंरक्षणासाठी गोळी झाडली. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी 6.30 च्या आसपास पोलिसांची टीम मुंब्रा बायपास जवळ आली. त्यावेळी ही घटना घडली. पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवर तीन गोळ्या झाडल्या. पोलिसांच्या गोळीबारामुळं जखमी झालेल्या अक्षयला कळवा रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी अक्षय शिंदेला मृत घोषित केलं. जखमी झालेल्या एपीआय निलेश मोरेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अक्षय शिंदेच्या दिशेने गोळ्या झाडणारे संजय शिंदे कोण?

पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी यापूर्वी माजी पोलिस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्यासोबत काम केले आहे. संजय शिंदे यांनी यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात काम केले आहे. तत्कालीन आयपीएस प्रदीप शर्मा त्याचे नेतृत्व करत होते. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला अटक करणाऱ्या टीममध्ये संजय शिंदे देखील होते. संजय शिंदे यांनी यापूर्वी मुंबई पोलिसातही काम केले आहे. सध्या ते बदलापूर बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचा (एसआयटी) भाग आहे.

संबंधित बातमी:

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला संपवणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे कोण?

संबंधित व्हिडीओ:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेरBIg Fight West Maharashtra : पश्चिम महाराष्ट्रातील प्रचारानंतरचा विचार, प्रचारानंतर कोणता मु्द्दा गजला?ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 November 2024Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget