एक्स्प्लोर

Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना

Akola Crime News: अकोला शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे.

Akola Crime News: अकोला (Akola) शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. अवघ्या 8 वर्षांच्या चिमुकलीवर 24 वर्षीय ओळखीच्या तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून अकोट फाईल पोलिसांनी तत्पर कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

Akola Crime News: ओळखीचा गैरफायदा घेत कृत्य

ही घटना अकोला शहरातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका गरीब कुटुंबातील पती-पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर आई आपल्या तीन मुलींसह वेगळी राहत होती. याच दरम्यान तिची ओळख सोहेल खान जमीर खान (वय 24, रा. संजय नगर) याच्याशी झाली. घरात येणे-जाणे वाढल्याचा गैरफायदा घेत आरोपीने चिमुकलीवर वाईट नजर ठेवली. सुरुवातीला अश्लील चाळे करत त्याने तिच्यावर अत्याचार केले.

Akola Crime News: मुलीने सांगितली आपबिती

आरोपीच्या त्रासाला कंटाळून अखेर 8 वर्षीय पीडित मुलीने वडिलांना घडलेला प्रकार सांगितला. पोटच्या मुलीवर ओढवलेला हा प्रसंग ऐकून वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला आणि मदतीची मागणी केली. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल करण्यात आली.

Akola Crime News:  पोलिसांची तत्काळ कारवाई

अकोट फाईल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रहीम शेख यांनी घटनेची गंभीर दखल घेत तात्काळ पथके रवाना केली. पोलिसांनी आरोपी सोहेल खान याला अटक केली असून त्याच्यावर विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अकोला शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mumbai Crime News: ब्रेकअप अन् तिचे दुसऱ्या मुलांसोबत फोटो; प्रेयसीकडून मानसिक त्रासासोबतच कथित जातीय अपमानास्पद वक्तव्ये, नैराश्यात गेलेल्या तरूणाने गळ्याला लावला दोर

Vasai Crime News: आई फोन उचलेना म्हणून मुलाने घरी येऊन पाहिलं; हॉलमध्ये रक्ताचे डाग अन् बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रूड्रायव्हर...,वसईत महिलेला घरात घुसून संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime : 73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
73 वर्षीय महिलेला 'लिव्ह-इन'चं आमिष दाखवून 57 लाखांना लुटलं; भामट्यामुळे वृद्धेवर आली वृद्धाश्रमात जाण्याची वेळ!
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 
गावठी कट्ट्यासह एका तरुणाला अटक, 1 लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त, जळगावच्या एमआयडीसी पोलिसांची कारवाई 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget