एक्स्प्लोर

Mumbai Crime News: ब्रेकअप अन् तिचे दुसऱ्या मुलांसोबत फोटो; प्रेयसीकडून मानसिक त्रासासोबतच कथित जातीय अपमानास्पद वक्तव्ये, नैराश्यात गेलेल्या तरूणाने गळ्याला लावला दोर

Mumbai Crime News: ब्रेकअपदरम्यान कथितरित्या प्रेयसीकडून करण्यात आलेल्या जातीय अपमानास्पद वक्तव्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता आणि त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

मुंबई: मुंबईतील वडाळा परिसरात १७ वर्षीय डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग) शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास (Mumbai crime news) घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली आहे. प्राथमिक तपासात मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेकअपदरम्यान कथितरित्या प्रेयसीकडून करण्यात आलेल्या जातीय अपमानास्पद वक्तव्यांमुळे तो मानसिकदृष्ट्या खचला होता आणि त्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.(Mumbai crime news)

या प्रकरणी वडाळा पोलीस स्टेशनध्ये (Wadala Police Station) विद्यार्थ्याच्या प्रेयसीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय आरोपी प्रेयसीविरुद्ध  भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita (BNS)) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्याच्या (Scheduled Castes and Scheduled Tribes (Prevention of Atrocities) Act) अंतर्गतही गुन्हेवार तरतूद केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.(Mumbai crime news) 

घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली तेव्हा मृत विद्यार्थ्याची आई ठाण्यात रुग्णालयात रोजच्याप्रमाणे कामावर गेली होती. आई कामासाठी घराबाहेर पडली तेव्हा मुलगा घरात एकटाच होता. संध्याकाळी त्याच्याशी संपर्क न झाल्याने कुटुंबाने त्याच्या मित्रांना घराकडे पाहायला पाठवले. तेव्हा घरात तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ केईएम रूग्णालयात (KEM Hospital) नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(Mumbai crime news)

पोलिसांनी प्राथमिक चौकशीत हे स्पष्ट केले आहे की, पीडित आणि प्रेयसी यांच्यातील नातं तुटल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी विद्यार्थ्याला तिला भेटण्यापासून रोखलं आणि त्यांना भेटू दिलं नाही. यामुळे तणाव वाढला आणि प्रेयसीने तिच्या सोशल मीडियावर इतर तरुणांसोबतचे फोटो पोस्ट करून त्याला मानसिक आणि भावनिक रित्या त्रास दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याआधीही त्याने ऑक्टोबर २०२५ मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.  या गंभीर प्रकरणात पोलिस सध्या अधिक सखोल तपास करत आहेत. पुढील चौकशीमध्ये अधिक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे.

जातीय वक्तव्यांचे आरोप आणि तणावग्रस्त नातेसंबंध

आईने दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलाची सेवरी परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत काही काळापासून ओळख होती. मात्र, त्यांच्या या नात्यात सातत्याने तणाव निर्माण होत होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये दोघांमध्ये झालेल्या वादानंतर मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहितीही तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. त्या घटनेनंतरही परिस्थितीत सुधारणा झाली नाही, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे, मुलीने हळूहळू मुलाशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्याला भेटण्यास नकार देत, त्याच्याशी नाते ठेवण्याची इच्छा नसल्याचे तिने स्पष्ट केल्याचे सांगितले. तसेच, तो खालच्या जातीतला असल्याचे कारण देत तिने त्याच्याशी संबंध ठेवू इच्छित नसल्याचे तिने त्याला सांगितल्याचा गंभीर आरोप आईने केला आहे. या कथित जातीय वक्तव्यांमुळे मुलगा मानसिकदृष्ट्या खचल्याचे आईन सांगितले.

याशिवाय, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाला सेवरी परिसरात येण्यास मज्जाव केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दोघांतील संवाद पूर्णपणे बंद झाला. या सर्व घटनांमुळे मुलगा अधिकच एकाकी पडला होता, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, मुलीने सोशल मीडियावर इतर मुलांसोबतचे फोटो स्टेटसवर टाकण्यास सुरुवात केल्याने मुलाची मानसिक स्थिती आणखी ढासळल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. हे फोटो जाणीवपूर्वक टाकून त्याला त्रास देण्याचा किंवा दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची भावना मुलामध्ये निर्माण झाली होती, असा दावा आईने केला आहे.

आईने दिली तक्रार; एफआयआरमध्ये महत्त्वाची माहिती

एफआयआरनुसार, तक्रारदार असलेली ३५ वर्षीय आई ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात कार्यरत असून ती वडाळा पूर्व येथील गिरिधर तांबा नगर परिसरात वास्तव्यास आहे. तिचा मुलगा दिवा येथे सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा शिक्षण घेत होता. जानेवारी २०२६ मध्ये त्याने पायी शिर्डीला जाऊन दर्शन घेतले होते. त्या प्रवासानंतर त्याच्या पायांना फोड आले होते, त्यामुळे तो काही दिवस महाविद्यालयात जाऊ शकला नव्हता, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.

१२ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता आई कामावर गेली होती आणि मुलगा घरी एकटाच होता. सायंकाळी सुमारे ५ वाजता तिचे त्याच्याशी शेवटचे बोलणे झाले. त्यानंतर सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तिने पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याने फोन न उचलल्याने तीला काळजी वाटू लागली. त्यानंतर तिने मुलाच्या एका मित्राला घरी जाऊन पाहण्यास सांगितले. मित्रांनी घराचा दरवाजा ठोठावला; मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Booking Rule : LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
LPG सिलेंडरच्या बुकिंग कालावधीमध्ये 'इतक्या' दिवसांची वाढ, इराण युद्धाचा फटका भारताला
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sanjay Gandhi National Park : वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप
वनसंरक्षकांच्या विरोधात स्थानिकांचं आंदोलन, मनमानी कारभाराचा आरोप
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report
Iran Israel : इराण-इस्त्रायल युद्धाबाबत ट्रम्प काय म्हणाले? Special Report
Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gas Shortage Impact : युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
युद्धाचा फटका! गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20 टक्के हॉटेल्स बंद; तीन दिवसांत 50 टक्के हॉटेल्स बंद होण्याची शक्यता
Sayali Surve : प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार; सायली सुर्वेचा आरोप
Bhandara : शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने पाचवीच्या विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
लातूरच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुंबईतून नाव झळकलं, पण ऐनवेळी छाटलं; भाजप पदाधिकाऱ्याने अंगावर डिझेल ओतलं
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
खासदारकीचं प्रमाणपत्र स्वीकारलं, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन; ज्योती वाघमारेंचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Embed widget