(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ahmednagar : फेसबुकवरून ओळख वाढवली, नंतर लग्नाचे आमिष दाखवून तीन वर्षे वारंवार अत्याचार; शिंदे गटाच्या संपर्कप्रमुखावर गुन्हा दाखल
Ahmednagar Crime : सुरूवातीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला, नंतर अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि गर्भवती केले. शिंदे गटाचा संपर्कप्रमुख सचिन जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर : फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार (Ahmednagar Rape Case Against Shiv Sena Leader) केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचा संपर्कप्रमुख आणि माजी नगरसेवक सचिन जाधव (Sachin Jadhav) याच्यावर नगरमधील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात 376, 376(2) (एन) 315, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
फेसबुकवरून ओळख वाढवली
फेसबुकच्या माध्यमातून 2020 मध्ये पीडित महिलेची आणि सचिन जाधव याची ओळख झाली होती. सचिन जाधवने त्या महिलेबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून महिलेचे अश्लील फोटो काढले. नंतर ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादी महिलेने केला आहे.
अत्याचाराला कंटाळून नगर सोडले
सचिन जाधव धमकी देत असल्याने संबंधित महिलेने नगर शहर सोडून 2021 मध्ये पुणे शहर गाठले होते. मात्र त्या ठिकाणी कुटुंबाचा आर्थिक खर्च भागत नसल्याने ती महिला पुन्हा अहमदनगर शहरात राहण्यास आली. ही गोष्ट सचिन जाधवला कळाल्यानंतर त्याने पुन्हा एकदा मोबाईल वरून संबंधित महिलेला संपर्क साधणे सुरू केले आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा अत्याचार करण्यास सुरुवात केली.
पीडित महिला गर्भवती राहिली
पीडित महिलेला गर्भवती राहिल्याने घाबरलेल्या सचिन जाधव याने त्या महिलेचा गर्भपात करण्यासाठी छळ करण्यास सुरुवात केला असा आरोप महिलेने केला आहे. याच वादातून सचिन जाधवने त्या महिलेच्या पोटावर लाथ मारल्याने पीडित महिलेचा अनैसर्गिक गर्भपात झाला होता. त्यानंतर पुन्हा सचिन जाधव याने त्या महिलेशी संबंध ठेवला आणि यातून पीडित महिलेने एका मुलाला जन्म दिला. मात्र त्या मुलाला जीवे ठार मारील अशी धमकी देऊन सचिन जाधव वारंवार त्या पीडित महिलेवर अत्याचार करत राहिला.
या धमकीला आणि सर्व बळजबरीला कंटाळून अखेर त्या पीडित महिलेने पोलीस स्टेशनला धाव घेऊन सचिन जाधव याच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात 376, 376(2) (एन) 315, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्याने केलेला हा गुन्हा उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
ही बातमी वाचा: