एक्स्प्लोर

Shevgaon Crime : शेवगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या 'अजब' सल्ल्यामुळे नागरिक त्रस्त; एबीपी माझाचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट

Police Inaction In Shevgaon : आठवडाभरात चोरीच्या अनेक घटना; जाब विचारणाऱ्या पत्रकारांना वरिष्ठांची उत्तरे, पोलीस अधीक्षकांकडूनही प्रतिसाद नाही.

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात चोरांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, गेल्या आठवडाभरात सलग झालेल्या चोऱ्यांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. एकीकडे सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली जगत असताना, दुसरीकडे शेवगाव पोलिसांची संशयास्पद आणि निरुत्साही भूमिका समोर आली आहे. विशेष म्हणजे, याबाबत जाब विचारणाऱ्या पत्रकारांना वरिष्ठांनी उलट उत्तरे देऊन टाळण्याचा प्रयत्न केला, तर खुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनीही फोन न उचलल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. चोरांच्या या मालिकेमुळे शेवगाव तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कुठे आणि कशी झाली चोरी?

शेवगाव तालुक्यातील अमरापूर, सुलतानपूर खुर्द, शहाजापूर आणि आव्हाने या परिसरात चोरट्यांनी हैदोस घातला आहे:

सुलतानपूर खुर्द : एका शेतकऱ्याच्या गोठ्यातून चोरांनी शेळ्या चोरून नेल्या.

अमरापूर (घटना 1) : सुभद्रा शिवराम पोटफोडे (वय80) यांच्या वर्षे गळ्यातील आणि कानातील सोन्याचे दागिने ती झोपेत असतानाच चोरट्यांनी लांबवले.

अमरापूर (घटना 2) : स्थानिक नागरिक एकनाथ चौधर यांच्या बांधकामाच्या ठिकाणी आणलेले 50 लोखंडी पत्रे चोरांनी थेट टेम्पो आणून पळवले. या चोरी गेलेल्या पत्र्यांची किंमत सुमारे 1 लाख रुपये आहे.

पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह

परिसरात सातत्याने चोरीच्या घटना घडत असूनही शेवगाव पोलीस याप्रकरणी गांभीर्याने तपास करत नसल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. पोलिसांच्या या दुर्लक्षामुळे संतप्त झालेले नागरिक 'आम्हाला सुरक्षेची हमी कोण देणार?ट असा सवाल उपस्थित करत आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा 'अजब' सल्ला

या सर्व प्रकाराबाबत माहिती घेण्यासाठी जेव्हा एबीपी माझाचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी शेवगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांची मुजोरी समोर आली. "आमची पेट्रोलिंग सुरू आहे, कोणाची तक्रार असेल तर त्यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल करावी," असा अजब सल्ला त्यांनी दिला. तसेच तक्रारदारांना पोलीस ठाण्यात पाठवून द्या, असे उद्धट उत्तर देऊन विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी फोन बंद केल्यामुळे प्रतिनिधींनी या गंभीर प्रकाराबाबत अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुम्मका यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस अधीक्षक मुम्मका यांनीही फोन न उचलल्यामुळे या सर्व प्रकरणावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया समोर येऊ शकली नाही.

सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची कोणाकडे?

स्थानिक पोलिसांची अरेरावी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष यामुळे शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. गुन्हे घडल्यानंतर उलट उत्तरे देऊन टाळले जात असेल आणि वरिष्ठ अधिकारीही प्रतिसाद देत नसतील, तर सर्वसामान्यांनी न्यायासाठी नक्की कोणाकडे जावे, असा सवाल आता विचारला जात आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
Shevgaon Crime : शेवगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या 'अजब' सल्ल्यामुळे नागरिक त्रस्त; एबीपी माझाचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट
शेवगाव तालुक्यात चोरांचा सुळसुळाट, पोलिसांच्या 'अजब' सल्ल्यामुळे नागरिक त्रस्त; एबीपी माझाचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट
Thane Crime News: ‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
‘रिंकू कुठे आहे? त्याला आज संपवून टाकतो’; हातात चॉपर घेऊन हॉटेलमध्ये धुडगूस, ठाण्यातील धक्कादायक घटना
Nashik Crime News: कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
कंट्रोल रूमला डायल 112 वर आला फोन, पोलिसांची एकच धावपळ; घटनास्थळी पोहोचताच संपूर्ण यंत्रणा चक्रावली, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
Embed widget