Dhule Accident News: आरटीओ कर्मचाऱ्याने थांबवण्याचा प्रयत्न केला अन् पुढच्या काही क्षणात भयंकर घडलं; भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक, धुळ्यात भीषण अपघात
Dhule Accident News: चाळीसगाव चौफुली भागात भरधाव वेगाने आलेल्या कंटेनरने चार वाहनांना दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

Dhule Accident News: धुळे (Dhule) शहराजवळील चाळीसगाव (Chalisgaon) चौफुली परिसरात मंगळवारी भीषण अपघात घडला. उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने (Container) चार वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ॲपे रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली.
Dhule Accident News: भरधाव कंटेनरची चार वाहनांना जोरदार धडक
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाण पुलावरून येणाऱ्या कंटेनरला आरटीओ (RTO) कर्मचाऱ्याने तपासणीसाठी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वाहन न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेले. याचदरम्यान चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कंटेनरने समोर असलेल्या चार वाहनांना जोरदार धडक दिली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. अपघातात ॲपे रिक्षाचा अक्षरशः चुराडा झाला. या भीषण धडकेत ॲपे रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीं
Dhule Accident News: नागरिकांचा गंभीर आरोप
अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरटीओ (RTO) कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चुकीच्या ठिकाणी कंटेनर थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला. तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. मात्र, या आरोपांबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Dhule Accident News: पोलिसांचा तपास सुरू
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. कंटेनर चालकाची चौकशी सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
इतर महत्त्वाच्या बातम्या
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?






















