एक्स्प्लोर

Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!

Ahilyanagar NEET Student Crime News: अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे नीट परीक्षेतील अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली.

Ahilyanagar NEET Student Crime News: अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथे नीट परीक्षेतील (NEET Exam Result 2026) अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याच्या नैराश्यातून एका विद्यार्थिनीने स्वतःचे जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली. अंकिता सांगळे (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. अंकिताला NEET परीक्षेत 166 गुण मिळाले होते. अंकिताच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे ही विद्यार्थिनी नीट परीक्षेची तयारी करत होती. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्याने ती मानसिक तणावात असल्याचे समोर आले आहे. अंकिताच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे. वडील ड्रायव्हर आहेत, तर आई शिवणकाम करते, अशा परिस्थितीतही तिच्या अभ्यासासाठी घरच्यांनी स्वतंत्र खोली तिला दिली होती, 25 जुलैला अंकिता तिच्या खोलीत अभ्यास करत असताना बराच वेळ होऊनही तिचा आवाज न आल्याने घरच्यांनी खोलीचे दार उघडले असता अंकिताने खोलीत गळफास घेतल्याचे त्यांनी पाहिले. (Ahilyanagar NEET Student Crime News)

अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत जीवन संपवलं- (Ahilyanagar NEET Student Ankita Sangle)

अंकिताने हे टोकाचे पाऊल उचलले तेव्हा तिचे वडील पंढरपूरला गेले होते. त्यांना ही घटना समजाच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. डोळ्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहात अंकिताने ज्या खोलीत अभ्यास केला, मेहनत घेतली त्याच खोलीत तिने आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करत पुढील तपास सुरू केला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नातेवाईक आणि नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, स्पर्धा परीक्षामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येतोय तो कमी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने संवेदनशीलपणे साथ देण्याची गरज या घटनेने पुन्हा अधोरेखित केली आहे.

अंकिताने सुसाईड नोट लिहीत घरच्यांची मागितली माफी- (Ankita Sangle Student News)

तुम्ही मला एवढा जीव लावला, पण मी तुमची एकपण इच्छा पूर्ण करू शकले नाही...मम्मी तू तर प्रत्येक संकटात मैत्रीण म्हणून साथ दिली... दादा तू पण मला खूप साथ दिली... मम्मी, पापा पेक्षा तू जास्त जीव लावला...माझ्या आत्महत्येला तुम्ही जबाब‌दार नाही आहात... तुम्ही मला जे सुख दिलंय ते मी कधीच विसरू शकत नाही... दादा तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ, त्यांना कोणत्या गोष्टीची कमी पडू देऊ नको...तू ही आनंदी रहा..तुम्ही आनंदी राहा... माझं काही चुकलं असेल तर माफ करा... तुम्हाला मी कोणतच सुख देऊ शकले नाही...आधीच मी NEET चा अभ्यास करत होते, तेव्हा पण सगळं काही त्याग केला तुम्ही... आणि मी काय केलं? तुमची इच्छा पूर्ण नाही करू शकले...आता कसला त्रास करून घेऊ नका...आनंदी राहा...तुमची दिदी, अंकिता, असं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar NEET Student Crime News: NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने अंकिताने जीवन संपवलं; चिठ्ठी वाचून कुटुंबीयांचा आक्रोश, म्हणाली, दादा, तू मम्मी पप्पांना चांगलं सांभाळ!
CJP Protest Pellet Gun: दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु
दिल्लीत RAF ने विद्यार्थ्यांवर बंदी असलेल्या त्या शस्त्राचा वापर केला, महत्त्वाची माहिती समोर, चौकशी सुरु
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Tukaram Mundhe FDA Action: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईला न्यायालयाचा मोठा झटका, 'त्या' दूध डेअरींवरील कारवाईला स्थगिती; नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
Nashik Crime: 13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
13 वर्षीय चिमुकलीवर वारंवार अत्याचार, मानसिक अन् शारीरिक छळाला कंटाळून पीडितेनं जीवन संपवलं; शवविच्छेदनानंतर भयावह सत्य समोर आलं, नराधमास जन्मठेप
Kushal Badrike In Maharashtrachi Hasiyajatra Watch Promo: 'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
'चला हवा येऊ द्या' नंतर कुशल बद्रिके आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणार; प्रोमो पाहून चाहत्यांची उत्सुकता शिगेला
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
Maharashtra Rain Update: राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
राज्यात आज कुठे यलो, कुठे ऑरेंज अलर्ट, तुमच्या जिल्ह्यात हवामान कसं असेल? जाणून घ्या सविस्तर
Embed widget