आई-वडिलांना कॅन्सर, मुलानं सोडली सैन्य दलातील नोकरी, आज सेंद्रिय शेतीतून मिळवतोय लाखो रुपये
आई-वडिलांच्या (Parents) सेवेसाठी एका तरुणाने सैन्य दलातील नोकरी (Army job) सोडली आहे. नोकरी सोडून या तरुणाने गावाकडचा रस्ता धरत सेंद्रीय शेतीचा (organic farming) प्रयोग केला आहे.
Success Story : आई-वडिलांच्या (Parents) सेवेसाठी एका तरुणाने सैन्य दलातील नोकरी (Army job) सोडली आहे. नोकरी सोडून या तरुणाने गावाकडचा रस्ता धरत सेंद्रीय शेतीचा (organic farming) प्रयोग केला आहे. राहुल (Rahul) असं उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बिजनौर जिल्ह्यातील या तरुणाचे नाव आहे. आई-वडिलांना दोघांनाही कॅन्सर (Cancer) म्हणजेच कर्करोग झाला आहे. त्यामुळं त्यांच्या सेवेसाठी राहुलने यांनी सैन्य दलातील नोकरी सोडली आहे. आज ते सेंद्रीय शेतीतून लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत.
सैन्य दलात नोकरीवर असताना आई वडिलांना कॅन्सर झाल्याचे समजले. त्यानंतर आई वडिलांच्या सेवेसाठी मी नोकरी सोडल्याची माहिती राहुल यांनी दिली. सध्या भारतात मोठ्या प्रमाणात कर्करोगाचं प्रमाण वाढत आहे. शेतीतील खते, किटकनाशके यांचा वापर वाढला आहे. ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असल्याचे दिसत असल्याचे राहुल यांनी सांगितले. सध्या अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहेत. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे राहुल म्हणाले.
शेतीतून महिन्याला 50000 रुपयांचे उत्पन्न
दरम्यान, सध्या आई वडिलांची सेवा करत करत सेंद्रीय शेती करत असल्याची माहिती राहुल यांनी दिली. या शेतीतून महिन्याला 50000 रुपये मिळत असल्याचे राहुल म्हणाले. तसेच अनेक शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा प्रयोग करावा यासाठी ते प्रोत्साहन देत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या गाठी भेटी घेत आहेत. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून इतरांना चांगल्या दर्जाचं अन्न पुरवणं हे उद्दीष्ट असल्याची माहिती राहुल यांनी दिली.
सेंद्रीय पद्धतीनं केळीसह ऊसाची लागवड
आपल्या शेतात सेंद्रीय पद्धतीनं केळीसह ऊसाची लागवड केल्याची माहिती राहुल यांनी दिली आहे.तीन एकर जमिनीवर केळीची तर पाच एकर जमिनीवर ऊसाची लागवड केलीय. सेंद्रीय केळीच्या विक्रीतून महिन्याला 50 ते 55 हजार रुपये मिळत असल्याची माहिती राहुल यांनी दिली. या दोन्ही पिकासाठी शेतात ठिबक सिंचनचा वापर केला आहे. यामुळं पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याची माहिती राहुल यांनी दिली. सेंद्रीय शेतीचं महत्व पटवून देण्यासाठी राहुल देशाच्या विविध भागात प्रवास करत असतात. तसेच शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीची घरबसल्या माहिती मिळावी यासाठी राहुल यांनी स्वतःचे YouTube चॅनेल देखील सुरु केलं आहे.
सेंद्रीय केळीची स्थानिक बाजारपेठेत विक्री
दरम्यान, पिकवलेल्या सेंद्रीय केळीची विक्री ही स्थानिक बाजारपेठेत केली जाते. परदेशात केळीची विक्री केली जात नाही, त्यामुळं स्थानिक बाजारात थोडासा दर कमी मिळतो. सेंद्रीय केळीचं बिजनौरमध्ये प्रमाण कमी असल्यामुळं मोठे निर्यातजार याठिकाणी येत नाहीत. त्यामुळं बाहेरच्या देशात केळीची निर्यात करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याची माहिती राहुल यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या: