1 नाही 2 नाही तब्बल 7 लाख रुपयांच्या इडलींची ऑर्डर, हैदराबादच्या तरुणाचं इडलीवर अनोख प्रेम
इडली लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याबाबत स्वीगीने एक मनोरंजक माहिती दिलीय. वर्षभरात एका व्यक्तीनं स्वीगीकडून (swiggy) 7.3 लाख रुपयांच्या इडलीची ऑर्डर केल्याची माहिती स्वीगीने दिलीय.
Idli Order News : अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात लोक इडलीचा (Idli) आस्वाद घेत असल्याचे चित्र दिसत आहे. इडला हा मुख्यत: दक्षिण भारतातील (South India) प्रसिद्ध पदार्थ आहे. पण ही दक्षिण भारतातील इडली आता देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. इडली लोकांमध्ये किती लोकप्रिय आहे, याबाबत स्वीगीने एक मनोरंजक माहिती दिलीय. वर्षभरात एका व्यक्तीनं स्वीगीकडून (swiggy) 7.3 लाख रुपयांच्या इडलीची ऑर्डर केल्याची माहिती स्वीगीने दिलीय.
इडली हा दक्षिण भारतातील प्रसिद्ध पदार्थ आहे. पण अलिकडच्या काळात देशाच्या कानाकोपऱ्यात इडलीची विक्री होताना दिसतेय. सकाळच्या नाष्टा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात इडलीचा वापर करतायेत. तर अनेक लोक स्वत: च्या घरी देखील इडली बनवतात. पण हैदराबादमधील एक व्यक्ती आसा आहे की, ज्याने वर्षभरात तब्बल 7.3 लाख रुपयाहून अधिक किंमतीच्या इडलीची ऑर्डर केलीय.
इडलीच्या मागणीसाठी आघाडीवर असणारी शहरं
दरवर्षी 30 मार्च हा दिवस जागतिक इडली दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त स्वीगीने हैदराबादमधील इडली प्रेमीची माहिती दिलीय. सकाळच्या वेळेत स्वीगीकडून मोठ्या प्रमाणात इडली ऑर्डर केल्या जातात. बंगळुरु, हैदराबाद, चेन्नई, मुंबई या शहरात मोठ्या प्रमाणात इडलीला मागणी असते. विशेष म्हणजे या इडलीत मसाल्याचा वापर नसतो, तेलाचा वापर नसतो त्यामुळं लोक मोठ्या प्रमाणात इडलीची ऑर्डर करतात.
महत्वाच्या बातम्या:
'स्विगी'चा फूड डिलीव्हरी एक्झिक्युटिव्ह लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात