एक्स्प्लोर

अंबानींच्या शाही विवाह सोहळ्यात राधिका मर्चंटच्या बहिणीची चर्चा, अंजली मर्चंट कोण आहेत?

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 12 जुलै रोजी विवाह होणार आहे. राधिका मर्चंट यांच्या मोठ्या बहिणीची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे.

Anjali Merchant Majithia : अब्जाधीश मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पुत्र अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या विवाह सोहळ्यासाठी भारतातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. राजकीय, सिनेसृष्टी तसेच अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती या विवाहाला उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून या विवाह सोहळ्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी अंबानी कुंटुंबानेही मोठी मेहनत घेतल्याचं दिसतंय. दरम्यान, अनंत आणि राधिका यांच्या विवाहापूर्वी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांत राधिका मर्चंटसोबत तिची मोठी बहीण अंजली मर्चंट दिसत आहेत त्यामुळे अंजली मर्चंट नेमकं काय करतात? त्या कुठे असतात? असे विचारले जात आहे. 

अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा 12 जुलै रोजी विवाह होणार आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील (Bandra Kula Complex)  जिओ वर्ल्ड कंन्व्हेंशन सेंटरमध्ये हा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. विवाहापूर्वीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत राधिका मर्चंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तसेच राधिक मार्चंट यांची मोठी भहीण अंजली मर्चंट यांचीही चर्चा होत आहे.

अंजली मर्चंट कोण आहेत?

अंजली मर्चंट यांचा अमन मजिठीया यांच्याशी 2020 साली विवाह झालेला आहे. अमन मजिठीया हे प्रसिद्ध उद्योजक आहेत. अंजली मर्चंट यांचा जन्म 1989  साली झाला.  त्यांचे शालेय शिक्षण गुजरातच्या कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल येथे झाले. त्यानंतर त्यांनी इकोल मॉडलिंग स्कुलमधून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतलेले आहे. तर लंडन स्कुल ऑफ बिझनेस येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अंजली मर्चंट या राधिका मर्चंटपेक्षा सहा वर्षांनी मोठ्या आहेत. 

वडिलांसोबत सांभाळतात उद्योग  

अंजली मर्चंट यांनी आपल्या करिअरला 2006 सालापासून सुरुवात केली. त्यांनी 2006 साली जाहिरात क्षेत्रात काही काळासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केले. त्यानंतर 2012 साली त्यांनी वडील वीरेन मर्चंट यांच्यासोबत घरातील उद्योग सांभाळायचे ठरवले. 2018 साली अंजली Dryfix या हेअर स्टायलिंग कंपनींच्या सहसंस्थापक झाल्या. बॉलिवूड जगतातील अनेक दिग्गजांच्या हेअर स्टायलिंगचे काम या कंपनीकडून केले जाते. 2021 साली अंजली यांनी आपल्या वडिलांच्या एनकॉर हेल्थकेअर आणि माइलॉन मेटल्स या कंपन्यांचे संचालकपद सांभाळले. अंजली मर्चंट यांचे पती अमन मजिठीया हे करोडपती आहेत. 

हेही वाचा :

Anant -Radhika Wedding Mumbai Traffic : अनंत-राधिकाच्या लग्नाची लगबग, मुंबईत VVIP ची वर्दळ; ट्राफिकमधील बदल घ्या जाणून...

Mukesh Ambani Childrens Net Worth :  आकाश-अनंत-ईशाचे शिक्षण किती? मुकेश अंबानींच्या मुलांकडे किती संपत्ती?

 

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
कमी गुंतवणूक, नफा अधिक! दररोज फक्त 195 रुपयांची बचत करा, 10 लाख रुपये मिळवा, पोस्टाची 'ही' आहे भन्नाट योजना 
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर
देशात रोजगाराच्या बाबातीत उत्तर प्रदेश आघाडीवर, महाराष्ट्राचा कितवा नंबर? इंडिया स्किल्स रिपोर्टमधून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget