George Soros : ओळख लपवून जगले... हमाली आणि वेटरचं काम केलं, अदानी समूहावरील आरोपाशी संबंध असलेले अब्जाधीश जॉर्ज सोरोस नेमके कोण?
Who Is George Soros : अमेरिकेतील जॉर्ज बुश यांचे सरकार पाडण्याचा आरोप जॉर्ज सोरोस यांच्यावर करण्यात आला होता.
Who Is George Soros : 1940 च्या दशकात हंगेरीमध्ये ज्यूंचे नरसंहार सुरू होतं आणि त्यावेळी एका 8 वर्षाच्या मुलाने आपली ज्यू धर्मीय ओळख लपवण्यासाठी खोटं ओळखपत्र तयार केलं. त्यानंतर हा मुलगा लंडनला आला आणि रेल्वे स्टेशनवर हमाल, हॉटेलमध्ये वेटरचे अशी मिळेल ती कामं करू लागला. मोठ्या संघर्षानंतर त्याचं नाव जगातल्या टॉप श्रीमंतांच्या यादीत आलं. 93 वर्षाच्या या व्यक्तीचं नाव आहे जॉर्ज सोरोस (George Soros). ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत त्याचं कारण म्हणजे OCCRP या संस्थेने अदानी समूहावर ((Gautam Adani)) केलेले आरोप. अदानी समूहाने मात्र यासंबंधित एक निवेदन जारी करुन हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
हिंडनबर्गच्या अहवालानंतर आता पुन्हा जवळपास आठ महिन्यानंतर अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले आहेत. या संबंधित अहवाल जारी करणाऱ्या संस्थेचं नाव आहे दी ऑर्गनाईज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (The Organised Crime and Corruption Reporting Project - OCCRP). या सस्थेला फंड दिला जातोय तो अमेरिकेतील अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांच्याकडून.
ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसा जॉर्ज सोरोस यांची एकूण संपत्ती ही 7.16 अब्ज डॉलर्स इतकी आहे. सध्याचा विचार करता ते जगातल्या पहिल्या 350 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आहेत.
Who is George Soros : संघर्षमय जीवन जगले, ओळख लपवून राहावं लागलं
जॉर्ज सोरोस यांचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट या ठिकाणी एका ज्यू परिवारात झाला. त्यावेळी जर्मनीचा हुकूमशाह हिटलरने ज्यू लोकांना मारण्याचा सपाटाच लावला होता. एकट्या हंगेरीतून हिटलरने पाच लाख ज्यू लोकांची हत्या केली होती. त्यामुळे जॉर्ज सोरोस या आठ वर्षाचा मुलगा आपली मूळ ओळख लपवून खोट्या ओळखीने वावरतल होता. 1945 साली दुसरं जागतिक महायुद्ध संपलं आणि हंगेरीमध्ये कम्युनिस्ट सरकार सत्तेत आलं. त्यानंतर जॉर्ज सोरोस यांच्या परिवाराने हंगेरी सोडण्याचा निर्णय घेतला.
जॉर्ज सोरोस आपल्या परिवारासह लंडनमध्ये आले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षणाचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते मिळेत ती नोकरी करू लागले. त्यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचं काम केलं. 1956 साली ते अमेरिकेला गेले. शेअर मार्केटमध्ये त्यांनी पैसे गुंतवायला सुरूवात केली आणि त्यामधून मोठी कमाई केली.
Bank Of England Crisis : बँक ऑफ इंग्लंड बुडाली आणि जॉर्ज सोरोस मालामाल झाले
सन 1992 साली जॉर्ज सोरोस यांनी करंन्सी व्हॅल्यूएशनमुळे मोठी कमाई केली. बँक ऑफ इंग्लड बुडाली आणि करंन्सी व्हॅल्यूएशनमुळे जॉर्ज सोरोस यांनी तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर कमावले. त्यावेळी ही सर्वात मोठी कमाई होती. याचप्रमाणे जॉर्ज सोरोस यांनी मलेशिया आणि थायलंडच्या करंन्सीवर शॉर्ट पोझिशन घेतलं आणि प्रचंड पैसा कमावला.
सन 1993 साली जॉर्ज सोरोस यांनी सोसायटी फाऊंडेशन नावाची एक संस्था सुरू केली. समाजसेवा करण्याचा उद्देश ठेऊन त्यांनी ही संस्था सुरू केली पण नंतर त्यावर राजकारणाचे आरोप होऊ लागले. 1999 साली या संस्थेने भारतात काम सुरू केलं, पण 2016 साली या संस्थेच्या फंडिंगवर भारत सरकारने बंदी घातली.
जॉर्ज सोरोस हे अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाला सर्वाधिक फंड देणाऱ्या व्यक्तींपैकी एक आहेत. अमेरिकेतील जॉर्ज बुश सरकार पाडण्यासाठी फंडिंग केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. आता भारतातील मोदी सरकारच्या विरोधात कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय.
भारत हो लोकशाहीवादी देश आहे पण मोदी हे लोकशाहीवादी नाहीत, ते हुकूमशाह असल्याचं वक्तव्य जॉर्ज सोरोस यांनी केलं होतं. त्यांनी अनेकदा भारत विरोधी वक्तव्यही केली आहेत. आता OCCRP या स्वयंसेवी संस्थेने अदानी समूहावर घोटाळ्याचे आरोप केले आहेत. जॉर्ज सोरोस हे या संस्थेला निधी पुरवतात.
ही बातमी वाचा: