मुंबई : सध्या आयटीआर (ITR) भरण्यासाठी नोकरदार लगबग करत आहेत. याच पार्श्वभूमीवर नव्या (New Tax Regime) आणि जुन्या करप्रणालीची (Old Tax regime) चर्चा होत आहे. देशातल्या प्रत्येक करदात्याने या दोन करप्रणातील एका करप्रणालीची निवड केलेली आहे. मात्र यातले काही करदाते असेही आहेत, ज्यांना त्यांची करप्रणाली बदलायची आहे? असा बदल करता येतो का? बदल करता येत असेल तर ते कसे करावे? उद्योजक आणि नोकरदार यांच्यासाठी नेमके काय नियम आहेत? हे जाणून घेऊ या...


दोन प्रकराचे असतात करदाते 


प्राप्तिकर भरणारे हे दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारात उद्योजक तर दुसऱ्या प्रकारात नोकरदार असतात. या दोन्ही करदात्यांना त्यांची करप्रणाली निवडण्याचे स्वातंत्र्य असते. विशेष म्हणजे त्यांना करप्रणाली बदलायची असेल असे तर तशी संधीदेखील दिली जाते. या संधीमध्ये मात्र फरक असतो. उद्योजकांना फक्त एकदाच करप्रणालीत बदल करता येतो. त्यानंतर त्यांना हा बदल कधीच करता येत नाही. तर नोकरदार मात्र प्रत्येक वर्षाला करप्रणालीत बदल करू शकतात.


नोकरदारांसाठी आहे वेगळा नियम


उदाहरणादाखल सांगायचं झाल्यास तुम्ही गेल्या आर्थिक वर्षात जुन्या करप्रणालीप्रमाणे कर भरला अशेल आणि तुम्हाला नव्या आर्थिक वर्षात नव्या करप्रणालीप्रमाणे कर भरायचा असेल, तस नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला तसा बदल करता येतो. त्यानंतर पुढच्या आर्थिक वर्षात पुन्हा एकदा करप्रणाली बदलता येते. कर्मचारी त्यांच्या इच्छेनुसार करप्रणाली निवडू शकतात. कर्मचाऱ्यांनी निवडलेल्या करप्रणालीप्रमाणेच कंपन्यांना कर कापण्याची मुभा असते. नोकरदारांना या असेसमेंट इअरचा रिटर्न भरताना करप्रणालीत बदल करता येईल. 


करप्रणाली बदलायची असेल तर 'हे' करा


लगेच करप्रणालीत बदल करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एचआर विभागाशी बोलावं लागेल. त्यांच्याशी चर्चा करून याबाबतची अतिरिक्त माहिती जाणून घ्या. कंपनीला अधिकृत मेल करून, अर्ज करून एचआर मॅनेजरच्या अप्रुव्हलनंतर कदाचित लगेच तुमच्या करप्रणालीत बदल होऊ शकतो.  


नवी करप्रणाली आहे डिफॉल्ट 


2023 साली केंद्र सरकारने नव्या करप्रणालीला डिफॉल्ट करप्रणाली म्हणून मान्यता दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही नव्या आर्थिक वर्षात कोणत्याही करप्रणालाची निवड न केल्यास तुमचा टीडीएस हा नव्या करप्रणालीप्रमाणे कापला जाईल. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटणाऱ्या करप्रणीची निवड करणे गरजेचे आहे. 


हेही वाचा :


तुमच्या पीएफ खात्यात अजूनही व्याज जमा झालं नाही? कसं तपासायचं? जाणून घ्या सोप्या स्टेप्स!


आरोग्य, जीवन ते दुर्घटना, आता एकाच पॉलीसीत मिळणार वेगवेगळे विमा लाभ; जाणून घ्या!


प्राप्तिकर आणि TDS यात नेमका फरक काय? 'हे' वाचा गोंधळ दूर होईल!