Mumbai Indians Playoff Chances : लखनौविरोधात मुंबई इंडियन्सचा चार विकेटने पराभव झाला. पण या पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफमधील आव्हान अधीक खडतर झाले आहे. मुंबई इंडियन्सचा दहा सामन्यातील सातवा पराभव ठरला. मुंबईचा संघ सहा गुणांसह नवव्या स्थानावर आहे. त्यात रनरेटही खूप खराब आहे. सात पराभवामुळे मुंबईचं प्लेऑफचं गणित आता अधिक खडतर झाले आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पाच वेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईवर प्लेऑफमधून बाहेर जाण्याचं संकट ओढावलं आहे.
प्लेऑफमधून बाहेर जाणार का मुंबई?
दहा सामन्यात सातवा पराभव होणारा मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होण्याच्या मार्गावर पोहचला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत तळाशी नवव्या क्रमांकावर आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित सामने मोठ्या फराकाने जिंकावेच लागतील. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर मुंबईला अवलंबून रहावे लागणार आहे. दिग्गजांचा भरणा असणाऱ्या मुंबईला यंदाच्या हंगामात शानदार कामगिरी करता आली नाही.
मुंबईच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करूनही संघाला पराभवाचा सामना करावा लागत आहे. आतापर्यंत 10 सामन्यांपैकी मुंबई संघाने 7 सामने गमावले असून तीन सामने जिंकले आहेत.
आरसीबी-मुंबई एकाच जहाजात -
मुंबई इंडियन्सला आयपीएल 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित 4 सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. मुंबई सर्व सामन्यात विजय मिळवला तर त्यांचे 14 गुण होतील. मुंबईला चार सामन्यात विजय मिळवताना नेट रनरेटही सुधारावा लागेल. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवर अलंबून राहावे लागेल. मुंबई इंडियन्स आणि आरसीबी सध्या एकाच जहाजात आहेत. कारण, दोन्ही संघाला दहा सामन्यात सात पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन्ही संघाला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सामन्यात विजय मिळवावा लागेल. त्याशिवाय इतर संघ पराभूत होतील, याचीही काळजी घ्यावी लागेल.
PL 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचे उर्वरित सामने -
मुंबई इंडियन्सचे चार सामने शिल्लक आहेत. त्यापैकी दोन सामने कोलकाता संघाविरोधात आहेत. तर एक सामना लखनौ आणि एक सामना हैदराबादविरोधात आहे. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे, चारमधील तीन सामने घरच्या वानखेडे मैदानावर आहेत. त्यामुळे मुंबईला विजयाची आशा असेल. पण चार सामने जिंकल्यानंतरही मुंबईला इतर संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवावं लागेल.
3 मे 2024- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
6 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद
11 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स
17 मे 2024 - मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स