मुंबई : कोविशिल्ड (Covishield) कोरोना लस घेतलेल्याना ब्रेन स्ट्रोक आणि गंभीर आजाराचा धोका होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. कोविशिल्ड (Covishield) लस बनवणाऱ्या ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) कंपनीने ही बाब मान्य केली आहे. पण कंपनीने सांगितलं आहे की, हा धोका फारच क्वचित जणांना होऊ शकतो. यामुळे कोविशिल्ड लस घेतलेल्यामध्ये घबराटीचे वातावरण आहे.


कोविशिल्ड लस घेतलीय? घाबरु नका


या लसीचा नेमका आरोग्यावर काय वाईट परिणाम होतो असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. आता कोविशिल्ड (Covishield) घेतलेल्या रुग्णांनी घाबरण्याची गरज नाही, असे डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे. डॉ. गोडसे यांनी यामागची तीन कारण पटवून दिली आहेत.


आता काही धोका नाही


डॉ. रवी गोडसे यांनी म्हटलं आहे की, ॲस्ट्राझेनेकाने (AstraZeneca) लस घेतल्याने एकदम गंभीर धोका असून रक्ताच्या गुठळ्या होऊन मृत्यू होण्याचा धोका आहे, असं सांगितलं जात आहे. भारतातील बहुतेकांनी ॲस्ट्राझेनेकाने लस घेतली आहे. पण, यापासून घाबरण्याचं मूळीच कारण नाही. याची तीन कारणं कोणती हे जाणून घ्या.


डॉ. रवी गोडसेंनी तीन मुद्द्यात सविस्तर सांगितलं 


1. पहिलं कारण म्हणजे हा दुष्परिणाम व्हायचा असता तर तो शक्यतो पहिला डोस घेतल्यानंतर तीन दिवसाच्या आत होतो, लस घेऊन तुम्हाला तीन दिवस झाले का? तुम्हाला पहिला डोस घेऊन तीन वर्षे होऊन गेली, भूतकाळात आहे तो आता, त्याला भुतासारखं घाबरू नका.


2. दुसरी गोष्ट म्हणजे हा धोका एवढा दुर्मिळ आहे की, एक कोटी लोकांमध्ये 16 जणांना होत असेल, आपण आहोत का यामध्ये, आपण कोटी-लाखात एक तरी आहोत का, आई सोडून कोणालाही विचारा हे. त्यामुळे घाबरू नका.


3. तिसरी गोष्ट म्हणजे ह्याचं प्रमाण शक्यतो तरुणींमध्ये जास्ती असतं. मी याआधी व्हिडीओ बनवला होता की, तुमचं वय 18 ते 30 असेल आणि तुम्ही तरुणी असाल तर कोविशील्ह ऐवजी कोवॅक्सीन लस घ्या. तुम्ही तरुणी आहात आणि तुम्ही कोविशिल्ड लस घेतली होती तर, घाबरु नका, हा धोका आता टळलेला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Covid Vaccine : कोविशिल्ड वॅक्सिन घेतलेल्यांसाठी धोक्याची घंटा! रक्ताच्या गाठी होण्याची धोका, एस्ट्राजझेनेका कंपनीची कबूली