(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ITR-U म्हणजे काय? लोकांसाठी ITR-U किती गरजेचा?
आयटीआर-यू (ITR U) किंवा इन्कम टॅक्स रिटर्न युनिकोड (युनिफाइड) फॉर्म भारतीय आयकर विभागाने तयार केला आहे. याचा उपयोग नेमका काय याबाबतची माहिती पाहुयात.
ITR U : आयटीआर-यू (ITR U) किंवा इन्कम टॅक्स रिटर्न युनिकोड (युनिफाइड) फॉर्म भारतीय आयकर विभागाने तयार केला आहे. ज्यांनी त्यांच्या आयकर रिटर्नमध्ये कोणतीही त्रुटी किंवा कोणत्याही माहितीमध्ये बदल केला असेल त्यांना संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ITR-U हे सुनिश्चित करते की, पूर्वीच्या आयकर रिटर्नमध्ये असलेल्या कोणत्याही चुका किंवा विरुद्ध माहिती दुरुस्त केली गेली आहे. त्यात जुनी परताव्याची माहिती आणि योग्य माहिती दोन्ही असते. आयकर विभागाच्या सूचनांचे पालन करुन तुम्हाला अद्ययावत प्राप्तिकर रिटर्न किंवा ITR-U फॉर्म भरावा लागेल.
जर तुम्ही गेल्या वर्षीही ITR भरला नसेल आणि आता तुम्हाला 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षांसाठी ITR भरायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला ITR U चा पर्याय निवडावा लागेल. पाहुयात याबाबतची सविस्तर माहिती.
आयटीआर-यू ही या लोकांसाठी लाइफलाईन
जर एखाद्या व्यक्तीने कायदेशीर पद्धतीनं आयकर रिटर्न भरले नाही आणि आयकर विभागाला कायदेशीर पद्धतीने त्रुटी आढळल्यास, त्याला 300 टक्के पर्यंत दंड होऊ शकतो. त्यामुळं वेळेवर आणि योग्य माहितीसह आयकर रिटर्न भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आयटीआर-यू जेव्हा एखाद्या व्यक्तीने देय तारखेपर्यंत मूळ आयटीआर दाखल केला असेल किंवा सुधारित आयटीआर दाखल केला असेल किंवा आयटीआरला विलंब केला असेल किंवा कोणत्याही आयटीआर भरण्यात डिफॉल्ट केले असेल तेव्हा ते दाखल केले जाऊ शकते. ITR-U ची अंतिम फाइलिंग तारीख मूल्यांकन वर्ष (AY) संपल्यापासून 24 महिन्यांच्या आत आहे. चालू आर्थिक वर्ष 2023-24 (AY 2024-25) पर्यंत FY 2020-21 (AY 2021-22) आणि FY 2021-22 (AY 2022-23) साठी अपडेट केलेले ITR (ITR-U) दाखल केले जाऊ शकते.
या आर्थिक वर्षासाठी ITR-U काम करणार नाही
जर एखाद्या व्यक्तीने मूळ ITR भरणे चुकवले असेल तर त्याला 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर दरम्यान विलंबित ITR दाखल करण्याचा अधिकार आहे. ही तारीख 31 डिसेंबर 2023 पर्यंत आहे. कृपया लक्षात घ्या की सुधारित आणि विलंबित आयटीआरची अंतिम मुदत संपेपर्यंत ITR-U दाखल करता येणार नाही. याचा अर्थ असा की व्यक्ती फक्त 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2026 पर्यंत FY 2022-23 (AY 2023-24) साठी ITR-U दाखल करु शकते.
महत्त्वाच्या बातम्या:
31 डिसेंबरपूर्वी 'हे' काम पूर्ण करा, नाहीतर होणार नुकसान; नियम बदलणार