210 रुपये गुंतवा अन् वर्षाला मिळवा 60 हजार रुपये, जाणून घ्या सरकारची 'ही' भन्नाट पेन्शन योजना आहे तरी काय?
What is Atal Pension Yojana : अटल पेन्शन योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयुष्याच्या उत्तरार्धात तब्बल 5000 रुपयांपर्यंत प्रतिमहा पेन्शन मिळू शकते.
Atal Pension Yojna : आयुष्याच्या उत्तरार्धात उत्पन्नाचा ठोस स्त्रोत नसल्यामुळे काही लोकांची फार आबाळ होत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. तरुण असताना अनेकजण आपल्या मुलांचं भविष्य घडवण्यासाठी पैसे लावतात. पण म्हातारपण आल्यावर आर्थिक गरजा कशा भागवायच्या? याचा विचारच अनेकजण करत नाहीत. पण तुमच्यासोबतही असंच घडू नये म्हणून म्हणून योग्य वेळी योग्य काळजी घेणे गरजेचे आहेत. म्हातारपणी नियमतिपणे पैसे मिळावेत यासाठी तुम्ही आतापासूनच गुंतवणूक करणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर तुमचे म्हातारपण सुरक्षित व्हावे. तुम्हाला पैशांची अडचण येऊ नये म्हणून सरकारच्या एका भन्नाट स्कीमबद्दल जाणून घेऊया...
तुम्हाला मिळू शकेल 5000 रुपयांचे पेन्शन
केंद्र सरकारतर्फे अटल पेन्शन योजना चालवली जाते. देशातील असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात पैशांची चणचण भासू नये म्हणून सरकारने ही योजना चालू केलेली आहे. या योजनेमुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला पेन्शनच्या रुपात प्रत्येक महिन्याला एक निश्चित रक्कम मिळत राहील. तुम्ही 18 वर्षे वयाचे असताना या योजनेत गुंतवणूक चालू केली तर तुम्हाला वर्षाला पेन्शन म्हणून तब्बल 60 हजार रुपये मिळू शकतात. उदाहरणासह सांगायचे झाल्यास एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत गुतवणूक चालू केली असेल तर वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला 5000 रुपये म्हणजेच वर्षाला 60 हजार रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक महिन्याला 210 रुपये गुंतवावे लागतील. म्हणजेच वयाच्या साठीनंतर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 5 हजार रुपये हवे असतील तर तुम्हाला 18 वर्षांचे असताना रोज फक्त 7 रुपये गुंतवावे लागतील.
अटल पेन्शन योजनेची अट काय?
अटल पेन्शन योजनेअंतर्गत एखाद्या व्यक्तीला 18 ते 40 वयापर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यानंत वयाच्या 60 वर्षांनंतर तुम्हाला पेन्शन मिळण्यास सुरुवात होते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीनुसा तुम्हाला 1000 ते 5000 रुपयांच्या तुलनेत तुम्हाला मासिक पेन्शन मिळते. पेन्शनधारकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम संबंधित व्यक्तीच्या जोडीदाराला दिली जाते.
1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर किती गुंतवणूक करावी लागेल?
तुम्हाला या योजनअंतर्गत 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळू शकतं. मुळात तुम्ही या योजनेत जेवढे जास्त रुपये गुंतवाल तुम्हाल तुमच्या 60 वर्षांनंतर तेवढेच जास्त पेन्शन मिळेल. तुम्हाला 1000 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळऊ शकते. तुम्हाला वयाच्या 18 व्या वर्षापासून गुंतवणूक चालू केली असेल आणि वयाच्या 60 वर्षांनंतर प्रत्येक महिन्याला तुम्हाला 1000 रुपयांचे पेन्शन हवे असेल आणि तुम्हाला प्रत्येक महिन्याला फक्त 42 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
यासोबतच तुम्हाला वयाच्या 60 व्या वर्षी महिन्याला 5000 रुपयांचे पेन्शन हवे असेल तर 18 वर्षांचे असताना तुम्हाला महिन्याला 210 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.
हेही वाचा :
गुगलचा मोठा निर्णय, 10 टक्के कर्मचाऱ्यांना देणार नारळ, नेमका का घेतला निर्णय?
कांद्याच्या दरात घसरण, शेतकरी आक्रमक, येवला बाजार समितीत कांद्याचे लिलाव पाडले बंद