एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

आता वोटर आयडी आणि आधार होणार लिंक; निवडणूक आयोगाची मोहीम सुरु, कशी कराल नोंदणी?

Election Commission of India ने देशभरात मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे.

Election Commission of India : निवडणूक आयोगानं (Election Commission of India) देशभरात मतदार ओळखपत्र (Voter ID Card) आधार कार्डशी (Aadhaar Card) लिंक करण्याची मोहीम सुरू केली आहे. महाराष्ट्र आणि झारखंडसारख्या राज्यांमध्ये निवडणूक आयोगाची विशेष मोहीम सुरू झाली आहे. ही लिंकिंग प्रक्रिया पूर्णपणे ऐच्छिक आणि विनामूल्य ठेवण्यात आली आहे. कोणत्याही मतदारांना हे करण्यास भाग पाडलं जाणार नाही. निवडणूक आयोग हे काम 31 मार्च 2023 पर्यंत पूर्ण करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

काय आहे दुरुस्ती विधेयक? 

निवडणूक आयोगाच्या या मोहिमेत मतदारांची ओळख पटवून देण्यासाठी आणि मतदार यादीतील (Electoral Roll) नोंदींचं प्रमाणीकरण या उद्देशानं मतदार ओळखपत्र आधारशी लिंक करण्याचं काम केलं जात आहे. दरम्यान, निवडणूक कायदा (सुधारणा) विधेयक (Election Law Amendment Bill), मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड लिंक करण्यास अधिकृत करतं. डिसेंबर 2021 मध्ये हे विधेयक लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं आहे.

अशी करा नोंदणी 

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी, सर्वात आधी NVSP पोर्टल (National Voter’s Service Portal) – www.nvsp.in वर नोंदणी करावी लागेल.
वेबसाइटवर जा आणि New User पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर मोबाईल नंबर आणि तुमचा कॅप्चा टाका.
आता तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो टाका.
यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल, ज्यामध्ये तुमची सर्व माहिती टाका. 
आता Submit बटणावर क्लिक करून तुमची सर्व माहिती रजिस्टर करा. 

मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करा 

NSVP पोर्टलच्या मुख्यपृष्ठावर, मतदार यादीवर (Electoral Roll) क्लिक करा. त्यानंतर तुमचा मतदार आयडी किंवा EPIC क्रमांक (EPIC NO.) आणि तुमच्या राज्याचा तपशील एंटर करा.
आता फीड आधार क्रमांक (Feed Aadhaar No) दिसेल. यावर क्लिक केल्यावर एक नवीन विंडो उघडेल. यामध्ये तुम्ही तुमचा आधार कार्ड तपशील आणि EPIC क्रमांक टाका.
यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा  E-mail ID वर OTP येईल. तुम्ही ते प्रविष्ट करताच, आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक झाल्याचं नोटीफिकेशन तुम्हाला दिसेल.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

मतदार ओळखपत्र आधारशी लिंक होणार; 1 ऑगस्टपासून राज्यात मोहीम सुरू होणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Konkan Project Special Report : नाणार आणि बारसू प्रकल्पांचं काय होणार?Murlidhar Mohol Special Report : मुरलीधर मोहोळ यांच्या नावाची का होतेय चर्चा?Maharashtra Election EVM Special Report : महाराष्ट्राचा निकाल, EVM वरून वाद, Baba Adhav यांचं आंदोलनSaudala Shirdi Special Report : शिव्या देणार त्याला 500 रुपये दंड बसणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
SKOCH Award :'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'शासन आपल्या दारी'चा आंतरराष्ट्रीय गौरव, महाराष्ट्राला प्रतिष्ठेचा 'स्कॉच पुरस्कार' प्रदान 
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
'EVM वर मतदान केलेल्या उमेदवारालाच बॅलेट पेपरवर मतदान करा'; ईव्हीएमची पोलखोल, ग्रामस्थांचं आयोगाच्या पुढंच पाऊल
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
सरकारी नोकरीची संधी, 'असिस्टंट ऑफिसर' पदासाठी 50 जागांवर भरती, एनटीपीसीमध्ये आजच करा अर्ज
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
अहमदनगरमध्ये चेष्टा मस्करी जीवावर बेतली, मित्राकडून मित्राचा अनावधानाने खून; गुन्हा दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स एका क्लिकवर, शनिवार 30 नोव्हेंबर 2024
Shardul Thakur : कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
कोण होतास, काय झालात तू, आयपीएलमध्ये कोणीच भाव देईना; शार्दूल ठाकूर सुद्धा 'पृथ्वी शॉ' होण्याच्या मार्गावर?
Embed widget