एक्स्प्लोर

वैष्णोदेवीला जाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, रेल्वेने केला 'हा' मोठा बदल

तुम्ही जर वैष्णोवदेवीला (vaishno devi) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, रेल्वेने आपल्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.

Vande Bharat Express : तुम्ही जर वैष्णोवदेवीला (vaishno devi) जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण, रेल्वेने आपल्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. भारतीय रेल्वेने (Indian Railways) नवी दिल्ली ते माता वैष्णोदेवी कटरा वंदे भारत एक्सप्रेसच्या (vande bharat express) वेळापत्रकात बदल केला आहे. ही भारतातील दुसरी सेमी-हाय-स्पीड ट्रेन आहे. 

दिल्ली ते कटरा जाणाऱ्या या ट्रेनचे नवीन वेळापत्रक 21 मार्च 2024 पासून लागू करण्यात येणार  आहे. ही ट्रेन 3 ऑक्टोबर 2019 रोजी सुरू झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हिरवा या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला होता. सध्या त्याची देखभाल आणि संचालन उत्तर रेल्वे विभागाकडून केले जात आहे. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी एफई अहवालात दिलेल्या माहितीनुसार, सामान्य लोकांच्या माहितीसाठी हे सांगणे अत्यंत आवश्यक आहे की, रेल्वेने रेल्वे क्रमांक 22439/22440 नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत रद्द केली आहे. एक्स्प्रेसच्या धावण्याचे दिवस बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ट्रेनच्या वेळापत्रकात बदल

ट्रेन क्रमांक 22439/22440 नवी दिल्ली-श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस बुधवार वगळता आठवड्यातून सहा दिवस दोन्ही दिशेने धावणार आहे. हे नवीन वेळापत्रक 21 मार्च 2024 पासून लागू होणार आहे. सध्या ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातील सर्व दिवस धावते.

अंतर आणि प्रवास वेळ

नवी दिल्ली ते श्री माता वैष्णो देवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेस 8 तासात 655 किमी अंतर कापते. जम्मू राजधानी एक्स्प्रेस आणि जम्मू तावी दुरांतो एक्स्प्रेसनंतर ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन आहे. दोन्ही गाड्या अनुक्रमे 08:20 तास आणि 08:40 तासांमध्ये समान अंतर कापतात.

ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबते?

नवी दिल्ली-श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्सप्रेसला 16 डबे आहेत. ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास आणि चेअर कार कोचचा समावेश आहे. ही अत्याधुनिक ट्रेन दोन शहरांमधील प्रवासादरम्यान तीन रेल्वे स्थानकांवर थांबते. ज्यामध्ये अंबाला कॅंट जंक्शन, लुधियाना जंक्शन आणि जम्मू तवी स्टेशनचा समावेश आहे.

ट्रेनचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये

नवी दिल्ली ते श्री माता वैष्णोदेवी कटरा-नवी दिल्ली वंदे भारत एक्स्प्रेस सुरु झाल्यानं जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पर्यटन वाढले आहे. दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ 3 तासांपेक्षा कमी झाला आहे. ही ट्रेन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे स्वप्नही पूर्ण करते. हा प्रकल्प भारतीय रेल्वेने सुरू केला होता. या प्रकल्पाच्या अनेक वंदे भारत गाड्या इतर शहरांमध्येही सुरू करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

Vande Sadharan Express: वंदे भारत एक्स्प्रेसनंतर आता प्रवाशांसाठी 'वंदे साधारण एक्स्प्रेस', एक्स्प्रेसची पहिली झलक 'माझा' वर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget