10 रुपयाच्या नोटेचा लिलाव होणार, 2 लाख रुपयाहून अधिक किंमत मिळणार? या नोटेत विशेष काय?
लंडनमध्ये (London) 106 वर्षांपूर्वी छापलेल्या जुन्या 10 रुपयांची नोटेचा (Note) लिलाव (auctioned) होणार आहे. या नोटेला दोन लाख रुपयाहून अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे.
Business News : लंडनमध्ये (London) 106 वर्षांपूर्वी छापलेल्या जुन्या 10 रुपयांची नोटेचा (Note) लिलाव (auctioned) होणार आहे. या नोटेला दोन लाख रुपयाहून अधिक पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या वस्तूंचा लिलाव ब्रिटनमधील मेफेअर येथे असलेल्या नूनन्स या लिलावगृहात केला जातो. आता याच लिलावगृहात 106 वर्षांपूर्वी छापलेल्या 10 रुपयांच्या दोन नोटांचा लिलाव होणार आहे. जाणून घेऊयात याबाबातची सविस्तर माहिती.
29 मे 2024 रोजी नोटांचा लिलाव होणार
बँक ऑफ इंग्लंडने 106 वर्षापूर्वी या 10 रुपयांच्या नोटा छापल्या होत्या. या नोटा जहाजांमध्ये भरुन भारतात पाठवल्या जात होत्या. पण दुर्दैवाने ते जहाज बुडाले. त्या जहाजावर भरलेल्या बहुतांश भारतीय चलनी नोटा नष्ट झाल्या. पण यातील दोन नोटा अद्यापही सुरक्षित आहेत. या दोन 10 रुपयांच्या नोटांचा लिलाव मेफेअरमधील नूनन्स ऑक्शन हाऊसमध्ये लिलाव केला जाणार आहे. हा लिलाव 29 मे 2024 रोजी होणार आहे. या स्वाक्षरी नसलेल्या नोटा असल्या तरी त्या उत्कृष्ट दर्जाच्या मूळ कागदावर छापल्या जातात. त्यांचे अनुक्रमांक देखील तेच आहेत. या नोटा लंडनहून एसएस शिराळा या जर्मन यू-बोटवरून भारतातील बॉम्बे (आता मुंबई) शहरात पाठवल्या जात होत्या. या नोटांचे संपूर्ण ब्लॉक्स आणि मूळ कागदपत्रे या जहाजावर लोड करण्यात आली होती.
नोटांना किती मिळणार किंमत?
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन नोटांच्या लिलावात 474 आणि 475 च्या किंमती निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या दोन्ही लॉटचा 29 मे रोजी लिलाव होणार आहे. या नोटांचा लिलाव 2.1 लाख ते 2.7 लाख रुपयांमध्ये केला जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही नोटा स्वाक्षरी नसलेल्या आहेत, उत्कृष्ट दर्जाच्या मूळ कागदावर छापलेल्या आहेत आणि अत्यंत दुर्मिळ नोटा आहेत. लंडनहून बॉम्बेला जाणारे जहाज बुडाले तेव्हा मालवाहतूकही झाली. अनेक नोटा किनाऱ्यावर तरंगल्या, ज्यामध्ये स्वाक्षरी नसलेल्या 5 आणि 10 रुपयांच्या नोटा आणि स्वाक्षरी केलेली 1 रुपयाची नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, यातील काही नोटा उत्तम स्थितीत आहेत.
एसएस शिराळा काय?
एसएस शिराळा ही त्या काळातील आधुनिक प्रवासी आणि मालवाहू नौका मानली जात असे. याचा उपयोग इंग्लंड ते भारताच्या नियोजित मार्गांवर प्रवासी आणि मालवाहतूक करण्यासाठी केला जात असे. 29 जून 1918 रोजी त्यांनी अखेरचा प्रवास सुरू केला. ती लंडनहून भारतात मुंबईला गेली. तिच्यावर प्रवासी तसेच विविध माल, शस्त्रास्त्रे, हस्तिदंती, वाईन, मुरंबा, लॉरी पार्ट्स, मॉडेल टी कारचे सुटे, हिरे आणि बँक ऑफ इंग्लंडकडून रुपये म्हणून छापलेले कागद यांचा समावेश होता.
2 जुलै 1918 रोजी जहाजामध्ये झाला स्फोट
2 जुलै 1918 रोजी शिराळा ओवर्स लाइटशिप जहाजाच्या ईशान्य-पूर्वेस चार मैलांवर होते. तेव्हा जहाजाचा स्फोट झाला. यानंतर जहाजाचे कॅप्टन ई.जी. मरे डिकेन्सनने सर्वांना जहाज रिकामे करण्याचे आदेश दिले. जहाजावरील सर्व 200 प्रवासी वाचले, परंतू, दुर्दैवाने, 100 क्रू मेंबर्सपैकी आठ मरण पावले.
महत्वाच्या बातम्या:
तब्बल 20 लाख 69 हजार रुपयांना शर्टचा लिलाव, या शर्टमध्ये खास काय?