(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तब्बल 20 लाख 69 हजार रुपयांना शर्टचा लिलाव, या शर्टमध्ये खास काय?
लंडनमध्ये (London) झालेल्या एका लिलावात एक शर्ट (shirt) 25000 डॉलरला म्हणजेच 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला गेलाय.
Expensive shirt : लंडनमध्ये (London) झालेल्या एका लिलावात एक शर्ट (shirt) 25000 डॉलरला म्हणजेच 20 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीला विकला गेलाय. जर खरेदीदाराचा प्रीमियम देखील जोडला गेला तर ही रक्कम 26,36,263 रुपये होते. आता सर्वांनाच असा प्रश्न पडला असेल की, या शर्टमध्ये एवढ खास काय आहे की ज्याची किंमत इतकी आहे. तर जाणून घेऊयात याबद्दलची सविस्तर माहिती.
या लिलावात 60 हून अधिक पोशाखांची विक्री
लंडनमध्ये एका शर्टचा 20,000 पौंड म्हणजेच 25,000 डॉलर्समध्ये लिलाव करण्यात आला. जर भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर त्याची किंमत सुमारे 20,69,491 रुपये आहे. इतिहासातील हा सर्वात प्रसिद्ध मानला जातो. 1995 च्या बीबीसी शो प्राइड अँड प्रिज्युडिसमध्ये अभिनेता कॉलिन फर्थने हा शर्ट घातला होता. यामध्ये फर्थने मिस्टर डार्सीची भूमिका केली होती. लिलावापूर्वी त्याची अंदाजे किंमत 7000 ते 10 हजार पौंड असल्याचे मानले जात होते. मंगळवारी झालेल्या या लिलावात 60 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही पोशाखांची विक्री झाली. यामध्ये मॅडोना, मार्गोट रॉबी आणि जॉनी डेप यांनी परिधान केलेल्या कपड्यांचा समावेश होता. पण सर्वात मोठा फटका कॉलिन फर्थने प्राइड अँड प्रिज्युडिसमध्ये घातलेल्या पांढऱ्या शर्टला बसला आहे.
तो सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून
हा लिलाव केरी टेलर ऑक्शन्सने आयोजित केला होता. टीव्ही इतिहासातील सर्वात प्रसिद्ध क्षणांपैकी एक ठरला. यामध्ये मिस्टर डार्सी त्यांच्या खासगी तलावात पोहायला जातात. ग्रेटर मँचेस्टरमधील स्टॉकपोर्टजवळील लाइम पार्क येथे त्याचे चित्रीकरण करण्यात आले. पोहल्यानंतर तो ओल्या शर्टमध्ये तलावातून बाहेर येतो आणि त्याची मैत्रीण एलिझाबेथ बेनेटकडे धावतो. या चित्रपटात एलिझाबेथ बेनेटची भूमिका ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री जेनिफर एहले यांनी केली होती. हा सीन प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आणि या सीनमुळे फर्थ हे जगभर सेक्स सिम्बॉल बनले.
लिलावात काय?
सुमारे 30 वर्षांनंतर, हा शर्ट त्याच्या अंदाजे दुप्पट किंमतीला विकला गेला. जर खरेदीदाराचा 5,000 पाउंडचा प्रीमियम देखील त्यात जोडला गेला तर त्याची किंमत 25,000 पौंड म्हणजेच 26,36,263 रुपये येते. ही संपूर्ण रक्कम चॅरिटीमध्ये जाईल. यामध्ये मॅडोना, ड्र्यू बॅरीमोर, मेरिल स्ट्रीप, डेप आणि हीथ लेजर यांचे पोशाखही लिलावासाठी ठेवण्यात आले होते. हा ऑनलाइन लिलाव 10 मार्चपर्यंत चालणार आहे. यामध्ये चित्रपट आणि टीव्ही जगतातील अनेक नामवंत व्यक्तींशी संबंधित गोष्टीही लिलावासाठी ठेवण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: