(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Twitter Deal Row : एलॉन मस्क यांना कोर्टाचा झटका, ऑक्टोबरपासून खटल्यावरील सुनावणीला सुरुवात
Elon Musk vs Twitter : एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला आहे. या प्रकरणात ऑक्टोबरपासून खटला सुरु होणार आहे.
Elon Musk vs Twitter : सध्या ट्विटर (Twitter) विरुद्ध एलॉन मस्क (Elon Musk) अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. टेस्लाचे (Tesla) मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटर डील (Twitter Deal) रद्द केली आहे. त्यानंतर ट्विटरनं हा वाद आता कोर्टात नेला आहे. या प्रकरणात ऑक्टोबरपासून खटला सुरु होणार आहे. एलॉन मस्क आणि ट्विटर यांच्यातील 44 अब्ज कोटींचा करार सुरुवातीपासूनच चर्चेता होता, पण अखेरीस मस्क यांनी ट्विटर डील मोडली आणि याविरोधात ट्विटरने कोर्टात धाव घेतली.
ट्विटर कंपनीने डेलावेअर येथे मस्क यांच्याविरोधात खटला दाखल केला आहे. याप्रकरणात डेलावेअरच्या न्यायाधीशांनी मंगळवारी एलॉन मस्क यांना झटका दिला. त्यांनी ट्विटर विरुद्ध एलॉन मस्क या खटल्यावरील सुनावणी ऑक्टोबरपासून सुरु होणार आदेश दिला आहे. मस्क यांनी या खटल्यासाठी फेब्रुवारीपर्यंतची मुदत मागितली होती. पण ट्विटरच्या मागणीनंतर न्यायालयाने हा खटला ऑक्टोबरमध्ये सुरु करण्याचा निर्णय दिला आहे.
डेलावेयरमधील कोर्ट ऑफ चॅन्सरीच्या चान्सलर कॅथलीन मॅककॉर्मिक यांनी सांगितले की, या खटल्यातील विलंबामुळे ट्विटरचे नुकसान होणार आहे. खटल्यासाठी एलॉन मस्क यांच्याकडून फेब्रुवारीमध्ये दोन आठवड्यांची सुनावणी ठेवण्याची मागणी केली होती. तर या प्रकरणातील खटला सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस ठेवण्याची मागणी ट्विटरकडून करण्यात आली होती. सध्या न्यायालयाने ऑक्टोबरमध्ये खटल्यावरील सुनावणी होणार असल्याच्या आदेशावर शिक्कामोर्तब केला आहे. ही सुनावणी पाच दिवसांची असेल.
ट्विटर खरेदीचा 44 अब्ज डॉलरचा करार रद्द
एलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर (Twitter) विकत घेणार नसल्याचं जाहीर केलं. कंपनीने अटी मोडल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता ट्विटरची 44 अब्ज डॉलरचा करार संपुष्टात आला आहे. एलॉन मस्क यांनी यासंदर्भात घोषणा करत, आपण ट्विटर विकत घेणार नसल्याचं सांगितलं आहे. एलॉन मस्क यांनी ट्विटरसोबतचा करार संपल्याची घोषणा करत कंपनीवर आरोप केले आहेत. मस्क यांनी म्हटलं आहे की, 'ट्विटर कंपनी बनावट खात्यांचा (Fake Accounts) तपशील देण्यात अयशस्वी ठरली.'
महत्त्वाच्या इतर बातम्या