एक्स्प्लोर

PM Suryodaya Yojana And Stocks :दोन महिन्यात 365 टक्क्यांचा परतावा, आता पीएम मोदींच्या घोषणेनंतर सुस्साट पळणार 'हा' शेअर?

PM Suryodaya Yojana And Stocks : आधीच शेअर दरात आतापर्यंतचा सर्वाकालिक उच्चांक गाठलेला हा स्टॉक आता पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या घोषणेमुळे आणखी वधारण्याची शक्यता आहे. 

PM Suryodaya Yojana And Stocks : स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच 365 टक्क्यांचा परतावा देणारा स्टॉक्स आता आणखी सुस्साट पळण्याची शक्यता आहे. आधीच शेअर दरात आतापर्यंतचा सर्वाकालिक उच्चांक गाठलेला हा स्टॉक आता पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी केलेल्या घोषणेमुळे आणखी वधारण्याची शक्यता आहे. 

सरकारी मिनीरत्न कंपनी इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना चांगलाच परतावा दिला आहे. IREDA ने नोव्हेंबर 2023 मध्ये 32 रुपयांच्या इश्यू किमतीत IPO आणला होता आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये 29 नोव्हेंबर रोजी सूचीबद्ध झाला होता. IREDA चे शेअर्स शनिवार, 20 जानेवारी 2024 रोजी 148.85 रुपयांवर बंद झाले, जे त्याच्या IPO किमतीपेक्षा 117 रुपयांनी जास्त होते.

लिस्टिंगनंतर स्टॉकच्या दरात 365 टक्क्यांनी वाढ

दोन महिन्यांतील IREDA च्या शेअर दरावर नजर टाकल्यास, 2024 मध्येच स्टॉकमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एका आठवड्यात स्टॉक 34 टक्के आणि एका महिन्यात 42 टक्क्यांनी वाढला आहे. आणि लिस्टिंगपासून स्टॉक 365 टक्क्यांनी वधारला आहे.

PM मोदींनी कोणती घोषणा केली?

अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सरकार 1 कोटी घरांवर छतावरील सौरऊर्जा बसविण्याच्या लक्ष्यासह प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार असल्याची घोषणा केली. घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी हा माझा संकल्प आणखी दृढ झाला. अयोध्येहून परतल्यानंतर, मी पहिला निर्णय घेतला आहे की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सोलर बसवण्याचे लक्ष्य घेऊन प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करणार आहे. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. 

1 कोटी घरांवर रुफटॉप सोलर, IREDA ला होणार फायदा

अलीकडे IREDA ने पीएम कुसुम योजना (PM-KUSUM) योजना, रूफटॉप सोलर आणि इतर B2C क्षेत्रांना कर्ज देण्यासाठी किरकोळ विभाग तयार केला आहे. IREDA च्या किरकोळ विभागाने कुसुम-बी योजनेअंतर्गत 58 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. मोदी सरकारच्या १ कोटी घरांवर रुफटॉप सोलर बसवण्याच्या योजनेचा फायदा IREDA ला होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

(Disclaimer : ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. शेअर विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. तज्ज्ञांच्या सल्ल्याने गुंतवणूक करावी.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pratibha Pawar Banner : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगलं हुतंय', प्रतिभाताई पवारांच्या हाती फलकVinod Tawde PC : राहुल गांधींच्या टीकेला तावडेंकडून प्रत्युत्तर; राजीव गांधी ते अदानी काय म्हणाले?Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 02 PM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Sharad Pawar : राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
राम शिंदेंनी 10 वर्ष काय दिवे लावले? दुष्काळी भागात स्वत:चा टोलेगंज बंगला बांधला; कर्जत जामखेडमधून शरद पवारांचा हल्लाबोल
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
''आपल्या राजाच्या वडिलांच्या नावाची बदनामी नको; शहाजी नाव काढून खोके पाटील ठेवा, कोर्टात जावा''
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर दक्षिणमध्ये भाजप हॅटट्रीक साधणार की ठाकरेंचा उमेदवार गड जिंकणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर मध्यमधून काँग्रेसची जादू चालणार की आडम मास्तरांना मताधिक्य मिळणार? कोण मारणार बाजी
Rohit Pawar : शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद,  रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
शरद पवार राजकारणातील वस्तादांचे वस्ताद, रोहित पवारांचं आजोबांसमोर धडाकेबाज भाषण, राम शिंदेंवर डागली तोफ
Embed widget