टॅक्स वाचवण्याच्या 5 सोप्या ट्रिक्स कोणत्या? पत्नीला गिफ्ट करुन कसा वाचवता येतो टॅक्स? जाणून घ्या सविस्तर माहिती
Tax Saving : काही ट्रीक्स वापरुन तुम्ही टॅक्स वाचवू (Tax Saving) शकता. तुम्ही तुमच्या पत्नीला गिफ्ट देऊन टॅक्स वाचवण्यासाठी शकता. जाणून घेऊयात पत्नीला कर्ज देऊन कर कसा वाचवता येतो, याबाबतची माहिती.
Tax Saving Tips News : तुम्ही जर मोठी कमाई (Income) करत असाल तर तुम्हाला टॅक्स (Tax) भरावा लागतो. मात्र, तुम्ही जर थोडं नियोजन केलं तर तुम्हाला हा टॅक्स भरावा लागणार नाही. काही ट्रीक्स वापरुन तुम्ही टॅक्स वाचवू (Tax Saving) शकता. तुम्ही तुमच्या पत्नीला गिफ्ट देऊन टॅक्स वाचवण्यासाठी शकता. जाणून घेऊयात पत्नीला कर्ज देऊन कर कसा वाचवता येतो,. टॅक्स वाचवायचा असेल तर सोप्या आणि कायदेशीर ट्रिक्स कोणत्या आहेत? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
तुमच्या पत्नीला पैसे गिफ्ट केल्यास त्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही
मोठी कमाई करणारे काहीजण करामध्ये सवलत मिळावी म्हणून पत्नीला गिफ्ट करतात. नेमका काय आहे हा प्रकार? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. यामुळं खरचं टॅक्स वाचवता येतो का? तर तुम्ही पत्नीच्या खात्यात पैसे जमा करुन कर वाचवण्याची पद्धत 'क्लबिंग प्रोव्हिजन' अंतर्गत येते. आयकर कायद्याच्या कलम 60 ते 64 नुसार, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या खात्यात पैसे जमा केले आणि त्यातून कोणतेही उत्पन्न (जसे की व्याज, भाडे, लाभांश) असेल तर ते उत्पन्न तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते. कर आकारला जातो. याला 'क्लबिंग प्रोव्हिजन' म्हणतात. तुम्ही तुमच्या पत्नीला पैसे गिफ्ट केल्यास त्यावर कोणताही टॅक्स लागणार नाही. असे असले तरी यातून मिळणारे उत्पन्न क्लबिंग तरतुदी अंतर्गत येऊन तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाऊ शकते.
पत्नीच्या नावावर तुम्ही मुदत ठेव, पीपीएफ सारखी गुंतवणूक करु शकता
तुमच्या पत्नीच्या नावाने जर पैसे नसतील तर तुम्ही तिच्या नावावर पैसे ठेवू शकता. किंवा मुदत ठेवी, म्युच्युअल फंड किंवा पीपीएफ सारखी गुंतवणूक तिच्या नावावर करु शकता. यामुळं तुमच्या उत्पन्नावर कमी कर लागेल. जर तुमचे घर तुमच्या पत्नीच्या नावावर असेल, तर तुम्ही तिला भाडे देऊन एचआरएचा लाभ घेऊ शकता. यामुळं तुमचे करपात्र उत्पन्न कमी होईल आणि तुम्ही कर सवलतीचा दावा करू शकाल.
बचत खात्याच्या व्याजावर 10000 पर्यंतची आयकर सवलत
तुमच्या पत्नीला भेटवस्तूऐवजी कमी व्याजावर कर्ज दिले तर त्यामुळे उत्पन्नात होणारी वाढ टाळता येईल. हे सर्व व्यवहार दस्तऐवजीकरण केलेले असणं गरजेचं आहे. तुमच्या पत्नीच्या बचत खात्यात पैसे जमा करुन तुम्ही त्यावर मिळणाऱ्या व्याजावर कर वाचवू शकता. बचत खात्याच्या व्याजावर 10000 पर्यंतची आयकर सवलत उपलब्ध आहे. तुमच्या पत्नीच्या नावावर गुंतवणूक करा. जेणेकरुन मिळालेल्या उत्पन्नावर कर कमी लागेल. क्लबिंग तरतूदीचा योग्यरित्या वापर करा. एचआरएद्वारे कर वाचवण्याचा प्रयत्न करा. हे करत असताना सर्व अटींची पूर्तता करा.
कर वाचवण्याचे पाच मार्ग कोणते?
ज्यांचं अद्याप लग् झालेलं नाही, त्यांनी लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या पत्नीच्या नावावर कोणतीही मालमत्ता किंवा भेटवस्तू केली तर ते उत्पन्नाच्या एकत्रीकरणाच्या तरतुदीत येणार नाही.
जर तुम्ही तुमच्या पत्नीला खर्चासाठी पैसे दिले आणि तिने त्यातून बचत केली तर तेही तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाणार नाही.
तुम्ही आरोग्य विम्याद्वारेही कर वाचवू शकता. कलम 80D अंतर्गत तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या नावावर आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत बचत करू शकता.
तुमच्या पत्नीला भेटवस्तूऐवजी कर्ज म्हणून पैसे देऊनही कर वाचवू शकता. तुम्ही तिला कमी व्याजावर कर्ज देऊ शकता. फक्त कर्ज देण्यापासून व्याज घेण्यापर्यंत सर्व कागदपत्रे सोबत ठेवा. यामुळे तुमच्या दोघांचे उत्पन्न क्लब होणार नाही आणि तुमचे कर दायित्व कमी होईल.
तुम्ही गुंतवणुकीसाठी संयुक्त खातेदेखील उघडू शकता. फक्त प्रायमरी होल्डर असा असावा, ज्याचे कर दायित्व कमी आहे. कारण जॉइंट अकाऊंटमध्ये व्याजावरील टॅक्स लॅबिलिटी प्रायमरी होल्डरकडे असतात.
महत्वाच्या बातम्या: