'या' योजनेच्या माध्यमातून करता येते 70 लाख रुपयांची कमाई, जाणून घ्या सविस्तर माहिती
सुकन्या समृद्धी योजनात (SSY) तुम्हाला 70 लाख रुपयांपर्यंत कमाई करता येते. या योजनेत तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळेल.
Government Scheme: केंद्र सरकार सर्वसामान्यांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक योजना आखत आहे. या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला आर्थिक पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. तसेच मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनानं एक योजना सुरु केली आहे. या योजनेचा मोठा लाभ होत आहे. सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असं या योजनेचं नाव आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
सुकन्या समृद्धी योजनात (SSY) तुम्हाला 70 लाख रुपयांपर्यंत कमाई करता येते. तुम्हाला कर सवलतीचाही लाभ मिळेल. ही योजना मुलींसाठी करमुक्त आहे. या योजनेअंतर्गत, जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे. यामध्ये तुम्ही दरवर्षी 250 ते 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता आणि इन्कम टॅक्सच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर सूटचा दावाही करू शकता. इतकेच नाही तर त्याच्या व्याजावर कोणताही कर भरावा लागणार नाही, म्हणजेच ही योजना पूर्णपणे करमुक्त आहे.
सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता काय?
सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी, भारतीय रहिवासी आणि मुलीचे पालक किंवा कायदेशीर पालक असणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या 10 वर्षांच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. तुम्ही तुमच्या मुलीच्या जन्मापासून ते 10 वर्षे वयापर्यंत SSY खाते उघडू शकता. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 2 मुलींसाठी खाते उघडता येईल. जर जुळ्या मुली असतील तर तिघांसाठी SSY खाते उघडता येते.
सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 टक्के निश्चित
केंद्र सरकारने जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीसाठी सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2 टक्के निश्चित केला आहे. सरकार दर तिमाहीत या योजनेअंतर्गत व्याजदर अपडेट करते. मॅच्युरिटीबद्दल बोलायचे झाले तर 15 वर्षांसाठी पैसे जमा करावे लागतात. हे खाते 21 वर्षांत परिपक्व होते. मात्र, मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर या खात्यातून निम्मी रक्कम काढता येईल.
कसे मिळणार 70 लाख रुपये?
सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याज दर प्रत्येक तिमाहीत सुधारित केला जातो. ही योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत कमाल व्याज दर 9.2 टक्के आणि किमान व्याज दर 7.6 टक्के आहे. एका गणनेनुसार, जर 21 वर्षांच्या संपूर्ण कालावधीत सरासरी व्याजदर 8 टक्के राहिला आणि तुम्ही या योजनेत 15 वर्षांसाठी दरवर्षी 1.5 लाख रुपये गुंतवले, तर तुम्हाला या खात्याअंतर्गत सुमारे 70 लाख रुपये मिळतील.
महत्वाच्या बातम्या:
कसा घ्याल PM सूर्योदय योजनेचा लाभ? 1 कोटी घरांना मिळणार मोफत वीज, किती पैसे होणार खर्च?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
