कसा घ्याल PM सूर्योदय योजनेचा लाभ? 1 कोटी घरांना मिळणार मोफत वीज, किती पैसे होणार खर्च?
मोदी सरकारनं देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना (PM Suryodaya Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत दरमहा 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
PM Suryodaya Yojana: मोदी सरकारनं देशातील 1 कोटी घरांना मोफत वीज देण्यासाठी पंतप्रधान सूर्योदय योजना (PM Suryodaya Yojana) सुरू केली आहे. या अंतर्गत दरमहा 300 युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे. या योजनेवर केंद्र सरकार 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करणार आहे. तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय ते जाणून घ्या.
कसा घ्याल पंतप्रधान सूर्योदय योजनेचा लाभ?
पीएम मोफत वीज योजनेअंतर्गत अर्ज करणे खूप सोपे आहे. यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनिटे द्यावी लागतील आणि https://pmsuryaghar.gov.in वर अर्ज करावा लागेल. विशेष बाब म्हणजे या योजनेअंतर्गत 300 युनिट मोफत वीजेसोबतच सरकार सबसिडीचा लाभही देत आहे. जो थेट तुमच्या बँक खात्यात पाठवला जाईल. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर या योजनेचे शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणाची योजना म्हणून वर्णन केले होते.
घरबसल्या अशी करा नोंदणी
https://pmsuryaghar.gov.in वर जा आणि सोलरसाठी अर्जाची निवड करा.
आता तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनीचे नाव निवडा. त्यानंतर तुमचा वीज ग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि ईमेल टाका.
यानंतर ग्राहक क्रमांक आणि मोबाइल टाकून नवीन पेजवर लॉगिन करा
यानंतर फॉर्म उघडेल आणि त्यामध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार रुफटॉप सोलर पॅनेलसाठी अर्ज केला जाईल.
तुम्हाला व्यवहार्यता मंजूरी मिळेल, त्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्कॉममध्ये नोंदणीकृत कोणत्याही विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करू शकाल.
सोलर पॅनेल बसवल्यानंतर, पुढील चरणात तुम्हाला प्लांटच्या तपशीलांसह नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.
नेट मीटर बसवल्यानंतर आणि DISCOM द्वारे पडताळणी केल्यानंतर, पोर्टलवरून तुम्हाला एक कमिशनिंग प्रमाणपत्र जारी केले जाईल.
हे प्रमाणपत्र जारी केल्यानंतर, तुम्हाला पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल आणि सबसिडी तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
वर्षभरात 4730 रुपयांची बचत होणार
जर तुम्हाला तुमच्या घरात 2kW चा रुफटॉप सोलर बसवायचा असेल, तर वेबसाईटवर उपलब्ध कॅल्क्युलेटरनुसार, एकूण प्रकल्पाची किंमत 47000 रुपये असेल. ज्यावर शासनाकडून 18000 रुपये अनुदान दिले जाईल. अशा प्रकारे रुफटॉप सोलर बसवण्यासाठी ग्राहकाला 29 हजार रुपये द्यावे लागतील. नियमानुसार यासाठी 130 चौरस फूट जागा असावी. 47,000 रुपये खर्चून बांधलेला सोलर प्लांट दररोज 4.32 Kwh/दिवस वीज निर्मिती करेल, जी वार्षिक 1576 kWh/वर्षावर येते. यामुळं ग्राहकाची दररोज 12.96 रुपये आणि वर्षभरात 4730 रुपयांची बचत होईल.
जर तुमचे रुफटॉप क्षेत्र 700 स्क्वेअर फूट असेल, तर 3 किलोवॅट पॅनेलसाठी तुमची गुंतवणूक 80000 असेल. यामध्ये तुम्हाला मिळणारे अनुदान 36000 रुपये असेल. म्हणजेच यासाठी तुम्हाला तुमच्या खिशातून फक्त 50,000 रुपये खर्च करावे लागतील.
महत्वाच्या बातम्या: