साखरसेह इथेनॉलमध्ये भारत पुढे, मात्र देशातील साखर उद्योगाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र, हर्षवर्धन पाटलांची माहिती
Harshvardhan Patil : देशातील साखर उद्योगाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचलं जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केलं.
Harshvardhan Patil : देशातील साखर उद्योगाविरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्र रचलं जात असल्याचे वक्तव्य राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी केलं. याचा मोठा परिणाम महाराष्ट्र (Maharashtra), गुजरात (Gujarat) आणि कर्नाटक (Karnataka) राज्यातील साखर उद्योगाला होणार असल्याचे पाटील म्हणाले. याबाबत न्यूयॉर्क टाईम्सला तिसऱ्यांदा बातमी आली आहे की, लेबरच शोषण केलं जातं, त्यांना फसवलं जातं, त्यांचं अपहरण केलं केलं जातं अशा खोट्या गोष्टी यात लिहिल्या असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. या सगळ्या मागे डोमेस्टिक मार्केटमधील साखर खरेदी केली जाऊ नये असा कट असल्याचे पाटील म्हणाले. आपला देश साखर, इथेनॉलमध्ये पुढे चालला आहे, त्यामुळं षडयंत्र रचलं जात असल्याचे ते म्हणाले.
माजलगावमधील काही संघटनांकडून परदेशात चुकीची माहिती दिली जातेय
आम्ही गृह मंत्रालय आणि इतर संस्थांना याची सविस्तर माहिती दिली असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. केंद्र सरकारने याचा संपूर्ण तपास करावा असंही त्यांनी सांगितलं. यावर आळा बसला नाही तर राज्यातला साखर उद्योग अडचणीत येईल असे पाटील म्हणाले. केंद्र सरकारने याची चौकशी सुरू केली आहे, ही फक्त साखर उद्योगाची नाही तर देशाची चिंता आहे. माजलगावमध्ये काही संघटना आहेत, त्या संघटना चुकीची माहिती परदेशाला देण्याचं काम करतात. त्यानंतर अशा गोष्टी समोर येत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. आपला देश साखर, इथेनॉलमध्ये पुढे चालला आहे, म्हणून अस षडयंत्र करून देशाचं साखरेचं मार्केट अडचणीत येईल याचा प्रयत्न होत असल्याचे पाटील म्हणाले. नवी दिल्लीत ICA ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्स 2024 संपन्न झाली. ही कॉन्फरन्स प्रथमच भारतात संपन्न झाली. या ग्लोबल कोऑपरेटिव्ह कॉन्फरन्ससाठी हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी भारतीय सागर उद्योगाविषयी विचार व्यक्त केले. तसेच विविध देशातून आलेल्या मान्यवरांच्या समवेत चर्चा देखील त्यांनी केली.
दरम्यान, भारतात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साखरेचं उत्पादन घेतलं जातं. देशात मोठ्या प्रमाणात ऊसाचं क्षेत्र आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक या राज्यात ऊसांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तसेच अलिकडच्या काळात सरकारनं इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन दिलं आहे. त्यामुळं इथेनॉलच्या उत्पादनात देखील वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Sugar Industry : इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटवले, केंद्राच्या एका निर्णयानं साखर कारखान्यांना दिलासा, शेअर बाजारात 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी