एक्स्प्लोर

देशातील सर्वात यशस्वी कंपन्या कोणत्या? तीन वर्षांपासून 'ही' कंपनी सर्वात मौल्यवान 

देशातील सर्वात यशस्वी 500 कंपन्यांचे  ( Successful Indian Companies)एकूण बाजार मूल्य 231 लाख कोटी रुपये आहे. हा आकडा जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा (GDP) जास्त आहे.

Successful Indian Companies: देशातील सर्वात यशस्वी 500 कंपन्यांचे  ( Successful Indian Companies) एकूण बाजार मूल्य 231 लाख कोटी रुपये आहे. हा आकडा जगातील अनेक देशांच्या जीडीपीपेक्षा (GDP) जास्त आहे. देशातील मोठ्या कंपन्या एकूण 44 शहरांमध्ये पसरल्या आहेत. गेल्या वर्षी या यादीत 36 शहरांमधील कंपन्यांचा समावेश होता. हे आकडे हुरुन इंडिया 500 च्या यादीतील आहेत. ॲक्सिस बँकेच्या सहकार्यानं हुरुनने सोमवारी ही यादी जारी केली आहे.

6700 कोटी रुपये किमान मूल्य असलेल्या कंपन्यांचा समावेश 

हुरुन इंडियाच्या 500 यादीत, ज्यांचे किमान मूल्य 6700 कोटी रुपये आहे त्यांनी संधी मिळाली आहे. गेल्या वर्षी हा आकडा 5,947 कोटी रुपये होता. यामध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, देशातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 1.3 टक्के कर्मचारी या कंपन्यांमध्ये काम करतात. या कंपन्या 70 लाख लोकांना रोजगार देत आहेत. ही सरासरी प्रति कंपनी 15,211 कर्मचारी आहे.

या यादीत कोची आणि सुरतसारख्या शहरांतील कंपन्याही 

हुरुन इंडियानं जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये केवळ मुंबई आणि बंगळुरुसारख्या शहरांतील कंपन्यांना स्थान मिळालेले नाही, तर कोची आणि सुरतसारख्या शहरांमधील कंपन्यांचाही त्यात समावेश आहे. या यादीत मुंबईतील सर्वाधिक 156 कंपन्यांचा समावेश आहे. यानंतर बंगळुरुमधील 59 आणि दिल्लीतील 39 कंपन्यांचा यात समावेश आहे. 235 वर्ष जुन्या ईआयडी पॅरीपासून 2021 मध्ये स्थापन झालेल्या स्टार्टअप्सनाही त्यात स्थान मिळाले आहे. दरम्यान, यामध्ये वित्त, आरोग्यसेवेपासून ते आयटी, ऑटोमोटिव्ह आणि बँकांपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. यावर्षी 61 नवीन कंपन्यांना यादीत स्थान मिळाले आहे. त्यापैकी 437 कंपन्यांच्या संचालक मंडळात महिलांचाही समावेश आहे.

रिलायन्स तीन वर्षांपासून देशातील सर्वात मौल्यवान कंपनी 

हुरुन लिस्टनुसार, गेल्या तीन वर्षांपासून रिलायन्स ही देशातील सर्वात मौल्यवान कंपनी राहिली आहे. यानंतर TCS आणि HDFC बँक यांचा समावेश होतो. यावर्षी एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि कोटक महिंद्रा बँक पहिल्या 10 मध्ये परतल्या आहेत. या यादीत अदानी समूहाच्या 8 कंपन्यांचा 4.3 टक्के हिस्सा आहे. त्याची एकूण किंमत 9.9 लाख कोटी रुपये एवढी आहे. हिंडेनबर्ग अहवालामुळे समूह कंपन्यांचे मूल्य 50 टक्क्यांनी घटले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याचे मूल्य सातत्याने वाढत आहे.

 342 कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले

या वर्षीही स्टार्टअप फंडिंग आणि बाजारमूल्यात घट दिसून येत आहे. Byju's, DealShare आणि PharmEasy ने खूप पैसे गमावले आहेत. FarmEasy ला देखील यादीतून वगळण्यात आले आहे. दरम्यान, असे असूनही, स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केलेल्या 6 युनिकॉर्नने 62,837 रुपये बाजारमूल्य मिळवले आहे. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने या यादीत 28 व्या स्थानावर स्थान मिळवले आहे. 2023 मध्ये या 500 कंपन्यांच्या विक्रीत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची एकूण विक्री 952अब्ज डॉलर्स झाली आहे. एकूण 342 कंपन्यांचे बाजारमूल्य वाढले आहे.

महत्वाच्या बातम्या:

भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत CRISIL चा नवा अंदाज, 2031 पर्यंत  GDP मध्ये किती होणार वाढ?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Jupiter Hospital : पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने अजूनही उपचार सुरूNagpur Chaiwala : नागपुरातील या चहावाल्याला शपथविधीचं आमंत्रणDrumstick rate Baramati : 100 रूपये पावशेरच्या दरानं विकली जातेय शेवग्याच्या शेंगाTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  12 PM : 3 डिसेंबर 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
मोठी बातमी : शपथविधीबाबत मंत्रालयात मोठ्या हालचाली, मुख्य सचिवांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक, भाजपचे बडे नेते रवाना
Shivam Dube : 6,6,6,6,6,6,6 शिवम दुबेनं षटकारांचा पाऊस पाडला, सूर्याकडूनही जोरदार धुलाई, मुंबईचा धावांचा डोंगर
शिवम दुबे अन् सूर्यकुमार यादवची बॅट तळपली, मुंबईच्या फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई
Kapaleshwar Mandir : कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
कपालेश्वर मंदिरात दोन गुरवांमध्ये वादावादी, 'त्या' पाच सिल दानपेट्या आज उघडणार, धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
Uddhav Thackeray: विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
विधानसभेला चारीमुंड्या चीत, आता शेवटचा गड वाचवण्यासाठी ठाकरे कामाला लागले, मुंबईतील शिलेदारांना मातोश्रीवर बोलावलं
शेवग्याच्या वरणासाठी  डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
शेवग्याच्या वरणासाठी डिसेंबरभर थांबावं लागणार? शेवगा 600 रुपये किलो! राज्यातील शेतकऱ्यांना फटका
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
मोठी बातमी :  खासदारकीला आव्हान, महाराष्ट्रातील भाजपच्या तरुण खासदाराला हायकोर्टाची नोटीस 
IPO Update : 125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
125 पट सबस्क्राइब झालेल्या आयपीओनं दिला 100 टक्के परतावा, C2CAS चे गुंतवणूकदार मालामाल
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ग्लॅम लूक; पांढऱ्या रफल टॉपमध्ये दिसतेय खास!
Embed widget