दिल्ली विद्यापीठामधून उत्तीर्ण, नोकरीऐवजी शेती करण्याचा तरुणीचा निर्णय, आज वर्षाला कमावतेय 45 लाख
आज आपण भाडेतत्वार जमिन घेऊन भरघोस उत्पादन घेणाऱ्या एका तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. अनुष्का जैस्वाल असं तिचं नाव असून तिनं भाजीपाला शेतीतून वर्षाला 45 लाख रुपयांचं उत्पन घेतलं आहे.
Success Story: अलिकडच्या काळात तरुण शेतकरी (Farmers) शेतीत विविध प्रयोग करताना दिसतायेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन भरघोस उत्पादन घेतायेत. तर काही तरुण नोकरी सोडून यशस्वी शेती करताना दिसतायेत. पुरुषांच्या बरोबरीनं महिला देखील शेतात काम करताना दिसतायेत. दरम्यान, आज आपण भाडेतत्वार जमिन घेऊन भरघोस उत्पादन घेणाऱ्या एका तरुणीची यशोगाथा पाहणार आहोत. अनुष्का जैस्वाल असं तिचं नाव असून, तिनं तिच्या शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकून नफा मिळत आहे. यातून अनुष्का जैस्वाल वार्षिक 45 लाख रुपयांचा नफा मिळवत आहे.
20 हून अधिक लोकांना रोजगार
दिल्ली विद्यापीठामधून उत्तीर्ण झालेल्या अनुष्का जैस्वालने यशस्वी शेती सुरु केली आहे. यातून ती मोठा नफा मिळवत आहे. उत्तर प्रदेशातील महिला आता पुरुषांच्या बरोबरीने विविध व्यवसायात यशस्वी होत आहेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती. आज महिला प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. अशा परिस्थितीत आज आपण भाजीपाल्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या अनुष्का जैस्वालबद्दल माहिती पाहणार आहोत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुणीने अभ्यासानंतर काम करण्याऐवजी शेतीचा मार्ग निवडला. आज ती दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक कमावत आहे. तर 20 हून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक 45 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.
वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात
2021 मध्ये अनुष्काने लखनऊच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन भाडेतत्वार घेऊन शेती करायला सुरुवात केली. त्यावेळी ती 23 वर्षांचा होती. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे शिक्षण तिनं घेतलं आहे. त्यानंतर तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. सरकारकडून मदत घेऊन तिने एक एकरावर पॉली हाऊस सुरु केले. आता ती आणखी 6 एकर शेती करत आहे. जिथे सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या आहेत. यातून तिला भरपूर नफाही मिळत आहे.
भाऊ पायलट, बहीण वकील
शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जात आहेत. त्यामुळे सातत्याने नफा मिळत आहे. कौटुंबिक इतिहासाबाबत अनुष्काने सांगितले की, माझे वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. तर माझा भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसल्याने त्यांच्याकडे वडिलोपार्जित काहीही नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. मग तीन एकर घेतली. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली.
सेंद्रिय पद्धतीनं हिरव्या भाज्यांची लागवड
कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे करता येईल हे अनुष्काने दाखवून दिले आहे. परिस्थिती अशी होती की एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन होते. तर लाल पिवळी भोपळी मिरचीचे पीक 35 टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीचा भावही चांगलाच मिळत आहे. लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे. आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. विशेष म्हणजे ही महिला शेतकरी सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करतात. तिला फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर पीक अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले आहे. त्यामुळं भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे. त्यामुळं आम्ही आमच्या पिकांवर अधिक लक्ष देऊ शकलो.
महत्वाच्या बातम्या: