Stock Market Holiday: आज महाराष्ट्र दिन, शेअर बाजाराला सुट्टी; कमोडिटी-करन्सी मार्केटमध्येही ट्रेडिंग नाही
Stock Market Holiday Today: आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन... आज शेअर बाजारात कोणतेही आर्थिक व्यवहार होणार नाहीत.
Stock Market Holiday Today: महाराष्ट्र दिनानिमित्त (Maharashtra Din 2023) आज भारतीय शेअर बाजारातील (Indian Stock Market) व्यवहार बंद राहणार आहेत. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (Bombay Stock Exchange) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (National Stock Exchange) मध्ये आज म्हणजेच, 1 मे 2023 रोजी ट्रेडिंग सत्र चालणार नाहीत. आज भारतीय शेअर बाजारात कोणत्याही प्रकारचे ट्रेडिंग होणार नाही.
शेअर मार्केटला आज सुट्टी
शेअर बाजाराच्या सुट्ट्यांच्या यादीनुसार, सोमवार, 1 मे 2023 महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्तानं शेअर बाजाराला सुट्टी आहे. आज संपूर्ण दिवस शेअर बाजारात कोणतेही व्यवहार होणार नाहीत आणि पुढील ट्रेडिंग सत्र मंगळवार, 2 मे 2023 रोजी असेल.
बीएसईच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती
बीएसईची अधिकृत वेबसाईट bseindia.com वर दिलेल्या माहितीनुसार, आज 1 मे 2023 रोजी इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि SLB सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत आणि ट्रेडिंगही बंद राहणार आहे. याशिवाय, करन्सी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटवरही व्यापार होणार नाही. महाराष्ट्र दिनानिमित्त आज भारतीय शेअर बाजारातील सर्व विभागांमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत.
कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटची काय परिस्थिती?
कमोडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंट आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिट्स (EGR) सेगमेंटमधील ट्रेडिंग सोमवारी सकाळच्या ट्रेडिंग सत्रात बंद राहील. हे सकाळचे सत्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल. मात्र, त्यानंतर सायंकाळी 5 वाजता ट्रेडिंग सत्र सुरू होईल. याचा अर्थ मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि नॅशनल कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच (NCDEX) वर सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोणताही व्यवहार होणार नाही.
मे महिन्यात 'या' दिवशी शेअर बाजार बंद
मे महिन्यात शेअर बाजाराला एकच सुट्टी आहे. इतर दिवशी शेअर बाजारातील व्यवहार सुरळीतपणे सुरू राहणार आहे. आज महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्तानं शेअर बाजार बंद असणार आहे. यानंतर दीर्घकाळ शेअर बाजारात साप्ताहिक सुट्टीशिवाय दुसरी सुट्टी नाही. यानंतर थेट 28 जून रोजी बकरी ईदनिमित्त शेअर बाजारात सुट्टी असणार आहे. 28 जूनला बकरी ईदनंतर जुलै महिन्यात शेअर बाजारात सुट्टी नाही. त्यानंतर देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजेच, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त शेअर बाजाराला सुट्टी असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
May 2023 New Rule: LPG सिलेंडर स्वस्त, GST च्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम