एक्स्प्लोर

पैसे ठेवा रेडी! 'हे' तीन आयपीओ तुम्हाला करू शकतात मालामाल!

शेअर बाजाराच्या पहिल्याच दिवशी चांगले पैसे कमवण्याची शक्यता आहे. या आठवड्यात अनेक चांगले आयपीओ येणार आहेत. तर काही आयपीओ हे गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.

मुंबई : शेअर बाजारातील (Share Market) या आठवड्याचा हा पहिला दिवस आहे. एक्झिट पोलचा (Exit Polls) अंदाज समोर आल्यानंतर आता  सोमवारी (3 जून) नेमकं काय घडणार? असा प्रश्न विचारला जातोय. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी अवघ्या एका दिवसावर आल्यामुळे आज शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात आज मोठे चढ-उतार होऊ शकतात. याच कारणामुळे गुंतवणूकदारांना आज चांगले पैसे कमवण्याची संधी आहे. दरम्यान, या आठवड्यात शेअर बाजारात एकूण तीन आयपीओ येत आहेत. यातील एक आयपीओ हा मेनबोर्ड आयपीओ तर दोन आयपीओ एसएमई क्षेत्रातील आहेत. यासह तीन आयपीओ असे आहेत, जे 3 आणि  4 जून रोजी बंद होणार आहेत. हे आयपीओ 30 आणि 31 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुले झाले आहेत.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मतानुसार सध्या शेअर बजार आणि आयपीओ हे चांगलेच तेजीत आहेत. सध्या शेअर बाजारात अस्थिरता असली तर काही आयपीओ मात्र मार्केटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. यामध्ये औफिस स्पेस सोल्यूशन्सच्या आयपीओचा समावेश आहे. याच कारणामुळे सध्या आगामी काळात येणाऱ्या आयपीओंबाबतही गुंतवणूकदार उत्सुक आहेत. 

आगामी आठवड्यात कोणकोणते आयपीओ येणार

क्रोनॉक्स लॅऐब सायंसेज आईपीओ : येत्या 3 जून रोजी हा आयपीओ सबस्क्रीप्शनसाठी खुलाह होणार आहे. 5 जूनपर्यंत गुंतवणूकदारांना या आयपीओत गुंतवणूक करता येईल. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी 0.96 कोटी शेअर्स विकणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 129 ते 136 रुपये प्रति शेअर असणार आहे.

मॅजेंटा लाइफकेअर आईपीओ : येत्या पाच जूनपासून या कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे.  सात जूनपर्यं तुम्हाला या आयपीओत पैसे गुंतवता येणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 35 रुपये प्रति शेअर आहे. 

सॉट्रिक्स आईपीओ : येत्या 5 जून रोजी हा आयपीओ खुला होणार असून 7 जूनपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. हा आयपीओ एसएमई सेगमेन्टमधील आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 18 लाख शेअर्स इश्यू करणार आहे. एसएमई सेगमेंटमधील हा आयपीओ 121 रुपये प्रति शेअर आहे.  

असोसिएटेड कोटर्स आईपीओ :  हा आयपीओ गुंतवणुकीसाठी 30 मे रोजी खुला झालेला असून 3 जूनपर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे. 5.11 कोटींच्या या आयपीओच्या माध्यमातून 4.22 लाख शेअर्स विकले जाणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 121 रुपये आहे.

अॅमट्रॉन इलेक्ट्रॉनिक्स आईपीओ : हा आयपीओ 30 मे रोजी खुला झालेला असून 3 जून रोजी तो बंद होणार आहे. एसएमई सेगमेंटमधील हा आयपीओ 87.02 कोटी रुपयांचा असून 54.05 लाख फ्रेश शेअर्स विकले जाणार आहेत. या आयपीओचा किंमत पट्टा 153 ते 161 रुपए प्रति शेअर आहे. 
टीबीआय कॉर्न आईपीओ : हा आयपीओ 31 मे रोजी गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. चार जून रोजीपर्यंत यात गुंतवणूक करता येईल. या आयपीओची साईझ 44.94 कोटी रुपये असून या माध्यमातून कंपनी 47.81 लाख शेअर्स विकणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा 90 ते 94 रुपए प्रति शेअर ठेवण्यात आलाय.

हेही वाचा :

जून महिन्यात बदललेले 'हे' नियम जाणून घ्या, अन्यथा भरावा लागेल मोठा दंड!

Bank Holiday : जून महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बँका बंद; जाणून घ्या नेमकी तारीख!

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaMaharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा : 29 Jan 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 03 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
डोनाल्ड ट्रम्प यांची 'दहशत' एक्स्प्रेस आता पाकिस्तानात पोहोचली, नाकांबदी केल्याने तगडा झटका बसणार
Embed widget