एक्स्प्लोर

Share Market: इस्त्रायल-इराण संघर्षात शेअर बाजार होरपळला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले, पाच प्रमुख कारणं

Stock Market : भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. याचं मुख्य कारण इस्त्रायलनं इराणवर  केलेले हल्ले असल्याचं मानलं जात आहे. 

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. सेन्सेक्स आणि निफ्टी 50  निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स 573 अंकांनी घसरुन 81118.60 अंकांवर पोहोचला. तर निफ्टी 50 मध्ये 170 अंकांची घसरण होऊन तो 24718.60 वर बंद झाला. दोन्ही निर्देशांक सुरुवातीला  1.7 टक्क्यांनी घसरले होते. मात्र, बाजाराचं सत्र संपेपर्यंत त्यामध्ये सुधारणा झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकात देखील घसरण झाली.  एका दिवसात बाजारमूल्य 2.4 लाख कोटी रुपयांनी घसरुन 447.2 लाख कोटी रुपये झालं आहे.  

पाच कारणांमुळं शेअर बाजार गडगडला

1. इस्त्रायल इराण संघर्ष
आज शेअर बाजारात घसरण झाली त्याचं सर्वात मोठं कारण इस्त्रायलनं इराणवर केलेला हल्ला मानला जात आहे. इस्त्रायलच्या हवाई दलानं इराणमधील अणवस्त्र केंद्र, मिसाईल कारखाने आणि इतर ठिकाणांवर हल्ले केले.  इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी इराणच्या अणवस्त्र केंद्राच्या मुख्य केंद्रावर वार केल्याचं सांगितलं. ही कारवाई आणखी काही दिवस सुरु राहू शकते, असं त्यांनी म्हटलं. या संघर्षामुळं जागतिक गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. याचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला.  


2. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ

इराणवर हल्ले झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ झाली. डब्ल्यूटीआय आणि ब्रेंट क्रूडच्या दरात 10 टक्के वाढ झाली. भारत जगातील मोठा तेल आयातदार देश आहे, यामुळं भारताला मोठा फटका बसू शकतो.  

3. सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य

विविध देशांमधील तणावामुळं गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवण्याचा विचार केला. सोने, अमेरिकन डॉलर्स आणि बाँडसची मागणी वाढली. भारतात सोन्याच्या दरात 2 टक्क्यांची वाढ झाली. अमेरिकेच्या डॉलर आणि बाँडमध्ये मजबुती आली.  जेव्हा गुंतवणूकदार जोखीम टाळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा शेअर बाजारात घसरण होते.  

4. रुपयात घसरण

भारतीय रुपयामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आज अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत रुपया 86.25 वर खुला झाला. त्यामध्ये 73 पैशांची घसरण झाली. ही 8 मे नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. रुपया कमजोर झाल्यास आयात महागते.  .

5. अमेरिका-चीन व्यापार करारावर प्रश्नचिन्ह 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार करार झाला आहे. मात्र, मार्केटला अधिक अपेक्षा होता, कराराच्या अटींबाबत स्पष्टता आलेली नाही. या अस्पष्टतेमुळं बाजाराचं सेंटीमेंट कमजोर झालं आहे. 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
ऑटोचालकाच्या घरात सापडले 3 कोटी रुपये, दोन दिवस झाले तरी कोणीच केला नाही दावा, नेमके पैसे कोणाचे?  
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
देशातील 'या' बँकेचा मोठा निर्णय, नियमांमध्ये केला बदल, ग्राहकांच्या खिशाला लागणार कात्री? तुमच खातं कोणत्या बँकेत?
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget